ईडीच्या पथकाने मंगळवारी सकाळी आमदार रवींद्र वायकर (Ravindra Waikar ED) यांच्या जोगेश्वरी येथील घरावर धाड टाकली आहे. मिळालेल्या माहितीनुसार ईडीच्या या पथकात १० ते १२ अधिकारी आहेत. सकाळी साडेआठच्या सुमारास ईडीचे पथक वायकर यांच्या घरी पोहोचले. तसेच वायकरांशी संबंधित आणखी सात ठिकाण्यांवर ईडीची छापेमारी सुरु आहे.
(हेही वाचा – Prime Minister Modi यांचा गुजरातमध्ये रोड शो, संयुक्त अरब अमिरातीचे अध्यक्षही उपस्थित)
मनपाच्या ५०० कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप –
जोगेश्वरीतील कथित भूखंड घोटाळाप्रकरणी ईडीकडून (Ravindra Waikar ED) ही धाड टाकण्यात आल्याचे समजते आहे. जोगेश्वरीतील मुंबई महानगर पालिकेचे खेळाचे मैदान आणि उद्यानांसाठी आरक्षित असलेल्या भूखंडावर पंचतारांकित हॉटेल बांधण्याची परवानगी मिळवून मनपाच्या ५०० कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप रवींद्र वायकर यांच्यावर आहे. या भूखंडासाठी परवानगी मिळवण्यासाठी त्यांनी आपल्या राजकीय संबंधांचा वापर केल्याचा आरोप वायकर यांच्यावर आहे. मुंबई आर्थिक गुन्हे शाखेने या प्रकरणी रवींद्र वायकर (Ravindra Waikar ED) आणि त्यांच्या पत्नीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
ED raids are underway at 7 locations related to Uddhav faction leader and MLA Ravindra Waikar and his partners in connection with a case of construction of a hotel at Jogeshwari by allegedly manipulating the land use conditions.
(file pic) pic.twitter.com/tQUO7bum2y
— ANI (@ANI) January 9, 2024
नेमकं प्रकरण काय ?
भाजप नेते किरीट सोमय्या यांनी रवींद्र वायकर यांच्यावर आर्थिक गैरव्यवहाराचे अनेक आरोप केले होते. उद्धव ठाकरे आणि रवींद्र वायकर (Ravindra Waikar ED) यांचे व्यावसायिक हितसंबंध असल्याचे सोमय्या यांनी म्हटले होते. त्यामुळे रवींद्र वायकर लवकरच तुरुंगात जातील, असा इशाराही सोमय्या यांनी अनेकदा दिला होता. परंतु, वायकर यांच्याविरोधात कोणतीही ठोस कारवाई झाली नव्हती. मात्र, आज ईडीच्या पथकाने वायकर यांच्या घरावर धाड टाकून निर्णायक कारवाईच्या दृष्टीने पहिले पाऊल टाकले आहे.
(हेही वाचा – Mohammed Shami Injury Update : मोहम्मद शामी इंग्लंड विरुद्ध पहिल्या दोन कसोटींना मुकणार)
त्यामुळे आता या धाडीत ईडीच्या हाती काही पुरावे लागतात का आणि त्या रवींद्र वायकर (Ravindra Waikar ED) यांच्यावर अटकेची कारवाई होईल का, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहणार आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community