पंजाब आणि महाराष्ट्र सहकारी बॅंकेत (PMC Bank) शेकडो खातेधारकांच्या घामाचा पैसा अडकला आहे. खातेधारकांना बॅंकेतून त्यांचा पैसा मिळवून देण्यासाठी सरकारने त्यात लक्ष घालावे अशी मागणी शिवसेनेचे खासदार रविंद्र वायकर (Ravindra Waikar) यांनी केली आहे. मुंबई उत्तर-पश्चिममधून शिवसेनेचे खासदार रविंद्र वायकर यांनी गुरुवारी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची भेट घेऊन पंजाब आणि महाराष्ट्र सहकारी बॅंकेत खातेधारकांच्या अडकलेल्या पैश्यांकडे लक्ष वेधले. पीएमसी बॅंकेने एचडीआयएल या कंपनीला सहा हजार कोटी रूपयाचे कर्ज दिले. यासाठी 25 हजार बोगस खाती उघडण्यात आली.
मात्र, ही बाब लक्षात येताच भारतीय रिझर्व बॅंकेने या बॅंकेवर निर्बंध लादले. यामुळे शेकडो खातेधारकांना आपला पैसा काढता येत नाही आहे. या बॅंकेत व्यक्तिगत ग्राहक, सहकारी पतसंस्था व सोसायट्या, नागरी सहकारी बँका आदींनी पैसे जमा केले होते. परंतु निर्बंधामुळे आता त्यांना पैसे काढता येत नाही आहे.
(हेही वाचा – Caste Politics : जातीवर जितेंद्र आव्हाडांची पोस्ट; टार्गेट झाले राहुल गांधी)
ज्या खातेधारकांच्या खात्यात पाच लाखांपेक्षा कमी रक्कम होती अशा 8,61,983 खातेदारांना रुपये 2187.4 कोटी तर 8282 संस्थाना 54.33 कोटी परत करण्यात आले. अशा एकूण 8,70,265 खातेदारांना 2241.7 कोटी रुपये देण्यात आले. मात्र, ज्या खातेधारकांच्या खात्यात पाच लाखांपेक्षा जास्त रक्कम होती त्यांना अजूनही त्यांचे पैसे मिळालेले नाहीत. अशा खातेधारकांची संख्या 36,823 असून त्यांचे 5,716 कोटी रूपये अडकून पडले आहेत. याशिवाय 2825 संस्थाचे 2769 कोटी रूपये बॅंकेत जमा आहेत. असे एकूण 39648 खातेदारक मिळून रुपये 8485 कोटी इतकी रक्कम बॅंकेत अडकून पडली आहे. खातेधारकांना आपला पैसा काढता यावा यासाठी जातीने लक्ष घालण्याची मागणी वायकर (Ravindra Waikar) यांनी सीतारामन यांच्याकडे केली आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community