उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातील विजयी शिवसेना उमेदवार रवींद्र वायकर (Ravindra Waikar) यांचे निवडणूक जिंकणे वादग्रस्त व शंकास्पद आहे, येथे पारदर्शक व कायदेशीर वातावरणात मतमोजणी झालेली नाही. त्यामुळे त्यांना लोकसभेत खासदार म्हणून शपथ देऊ नये, अशी मागणी प्रतिस्पर्धी हिंदू समाज पार्टीचे एक उमेदवार भरत शाह (Bharat Shah) यांनी त्यांचे वकील ॲडव्होकेट असीम सरोदे यांच्यामार्फत लोकसभा सचिव (Lok Sabha Secretary) उत्पलकुमार सिंग यांना नोटीस पाठवून केली आहे.
(हेही वाचा – Hamare Baarah चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या प्रदर्शनाचा रस्ता मोकळा; उच्च न्यायालय म्हणते, हा सामाजिक विषय)
संविधान प्रक्रिया अपवित्र करण्याची परवानगी होणार ?
भरत शाह यांनी पाठवलेल्या नोटीसमध्ये नमूद करण्यात आले आहे की, भारतात पहिल्यांदा ईव्हीएम मशीन मतमोजणीबाबत एफआयआर दाखल झाला आहे. त्यामुळे रवींद्र वायकर (Ravindra Waikar) यांना आर्टिकल 99 नुसार त्यांना खासदारकीची शपथ देणे म्हणजे संविधान प्रक्रिया अपवित्र करण्याची परवानगी देणे ठरेल. निवडणूक जिंकण्यासाठी भ्रष्ट व बेकायदेशीर मार्गांचा वापर करण्याच्या या उघड प्रकरणी दाद मागण्यासाठी भरत खिमजी शाह यांनी मुंबई उच्च न्यायालयात इलेक्शन पिटिशन दाखल करणार असल्याचे सुद्धा जाहीर केले आहे.
मुंबई उत्तर-पश्चिम मतदारसंघात नेस्को सेंटर या मतमोजणी केंद्रावरील सीसीटीव्ही फुटेज देण्याचे मुद्दाम टाळण्यात येत आहे. ही वस्तुस्थिती हेच दाखविणारी आहे की, सरकारी यंत्रणा सत्य लपविण्यासाठी वायकर यांना एकनाथ शिंदे व केंद्र सरकारच्या दबावाखाली मदत करीत आहे, असेही भरत शाह यांनी नमूद केले आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community