Ravindra Waikar यांच्या शिंदे गटातील प्रवेशाबाबत उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले ..

माझ्या मतदारसंघातील कामे मार्गी लागली पाहिजे, या दृष्टीने मी प्रामुख्याने शिंदे साहेबांच्या नेतृत्वातील शिवसेनेत प्रवेश केला. वायकर म्हणाले की, आरे बाबतीत लोक रडताहेत. रॉयल पंप एरियात पाण्याचे पंप, धोरणात्मक निर्णय बदलण्याची गरज होती म्हणून लोकांचे काम करणे गरजेचे आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे न्याय देतील म्हणून शिवसेनेत दाखल झालो.

440
Ravindra Waikar यांच्या शिंदे गटातील प्रवेशाबाबत उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले ..

उबाठा गटाचे आमदार रवींद्र वायकर (Ravindra Waikar) यांनी शिवसेना शिंदे गटात रविवारी, १० मार्च रोजी रात्री जाहीर प्रवेश केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा बंगल्यावर हा प्रवेश सोहळा पार पडला. यावेळी खासदार गजानन कीर्तिकर यांची उपस्थिती होती. ऐन लोकसभा निवडणूक तोंडावर असतानाच उद्धव ठाकरे यांना पुन्हा धक्का मानला जात आहे.

(हेही वाचा – Rahul Gandhi यांच्या भारत जोडो न्याय यात्रेदरम्यान ‘जय श्रीराम’च्या घोषणा)

धोरणात्मक निर्णय घ्यावे लागतात – वायकर

माझ्या मतदारसंघातील कामे मार्गी लागली पाहिजे, या दृष्टीने मी प्रामुख्याने शिंदे साहेबांच्या नेतृत्वातील शिवसेनेत प्रवेश केला. वायकर म्हणाले की, आरे बाबतीत लोक रडताहेत. रॉयल पंप एरियात पाण्याचे पंप, धोरणात्मक निर्णय बदलण्याची गरज होती म्हणून लोकांचे काम करणे गरजेचे आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे न्याय देतील म्हणून शिवसेनेत दाखल झालो, असे रवींद्र वायकर (Ravindra Waikar)  माध्यमांशी बोलताना म्हणाले.

यावर आता ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. “मोठी झाली ती लोकं (Ravindra Waikar) गेली. मात्र मोठं करणारे इथेच आहेत”, अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली.

(हेही वाचा – Coastal Road : कोस्टल रोड ‘या’ दोन दिवशी राहणार बंद, एवढेच दिवस आणि एवढ्या वेळातच करता येईल प्रवास)

नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे ?

“ज्याला कोणाला वाटत असेल इकडचा खडा तिकडं केला तर परिणाम होईल. मात्र काल जी गर्दी होती ती आजही आहे. मोठी झाली ती लोकं गेली. मात्र मोठं करणारे इथेच आहेत”, अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली आहे. गोरेगाव येथे उद्धव ठाकरेंची जनसंवाद सभा पार पडली. यावेळी ते बोलत होते. (Ravindra Waikar)

मुठभर मावळे एकनिष्ठ असतात :

उत्तर पश्चिममध्ये मी अमोल कीर्तिकर याचं नाव घोषित केले. देशभक्त आणि द्वेषभक्त असा हा लढा आहे. कोणाला उतरवायचे मैदानात त्याला उतरावा. (Uddhav Thackeray) हुकूमशाही काढण्यासाठी आपण एकत्र आलेलो आहोत.शिवसेनेच्या झेंड्याला डाग लावण्याचे काम भाजपने केले. त्यांच्यावर हा खरा भगवा फडकवण्याचं काम मला करायचंय.निष्ठावंताला पराभव हा कधी माहीत नसतो. मुठभर मावळे एकनिष्ठ असतात. (Ravindra Waikar)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.