Ravindra Waikar: रवींद्र वायकरांना मुंबई पोलिसांकडून क्लीन चीट!

135
Ravindra Waikar: रवींद्र वायकरांना मुंबई पोलिसांकडून क्लीन चीट!
Ravindra Waikar: रवींद्र वायकरांना मुंबई पोलिसांकडून क्लीन चीट!

रवींद्र वायकर (Ravindra Waikar) यांना मुंबई पोलिसांकडून (Mumbai Police) क्लीन चीट मिळाली आहे. जोगेश्वरी भूखंड घोटाळा प्रकरणी (Jogeshwari Plot Scam Case) EOW कडून कोर्टात सी समरी रिपोर्ट सादर करण्यात आला आहे. गैरसमजातून मुंबई महानगरपालिकेनं (Mumbai Municipal Corporation) गुन्हा दाखल केल्याचं मुंबई पोलिसांनी म्हटलं आहे. त्यामुळे रविंद्र वायकरांवरील सर्व गुन्हे मागे घेण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

(हेही वाचा –Hathras Stampede: हाथरस चेंगराचेंगरी प्रकरणातील मुख्य आरोपीचं पोलिसांसमोर आत्मसमर्पण!)

मुंबई महानगरपालिकेकडून दाखल झालेली तक्रार गैरसमजातून केल्याचा दावा करण्यात आला आहे. दरम्यान, रवींद्र वायकर त्यांच्या पत्नी मनिषा आणि त्यांचे भागीदार आसू नेहलानी, राज लालचंदानी, प्रिथपाल बिंद्रा आणि आर्किटेक्ट अरूण दुबे यांच्याविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला होता. (Ravindra Waikar)

(हेही वाचा –Mumbai Metro Line 3 साठी जायकाकडून कर्ज, भारत सरकारने केली करारावर स्वाक्षरी)

महाविकास आघाडी सरकारच्या काळात सार्वजनिक वापरासाठीचा राखीव भूखंड लाटून त्यावर पंचतारांकीत हॉटेल बांधण्याचा घाट घालून 500 कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप किरीट सोमय्यांनी केला होता. या गैरव्यवहारातून पालिकेचा महसूल बुडवल्याचा आरोप करत पालिका अभियंता संतोष मांडवकर यांच्या तक्रारीवरून आझाद मैदान पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. (Ravindra Waikar)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.