रविश कुमार यांचे राजीनामा नाट्य! किती खरे, किती खोटे?

82

लिबरल्स लोकांची सर्वात आवडती वृत्तवाहिनी म्हणजे एनडीटिव्ही. रविश कुमार हे त्यांचे आवडते पत्रकार. राजदीप सरदेसाई, बरखा दत्त इ. डाव्या विचारांच्या पत्रकारांमध्ये रविश कुमार यांचे महत्व अनन्य साधारण आहे. कारण त्यांनी आपली एक प्रतिमा निर्माण केली आहे. अतिशय शांत संयमी पद्धतीने त्यांचं बोलणं, त्यांना जी परिस्थिती वाईट वाटते त्याबद्दल भाष्य करताना त्यांचे चिंताग्रस्त हावभाव, शक्यतो उगाच आवाज न चढू देता उत्कृष्ट हिंदीतले त्यांचे संवाद यामुळे त्यांनी त्यांच्या विचारांच्या प्रेक्षकांमध्ये आदराचं स्थान निर्माण केलं आहे.

आता इतकी वर्षे एनडीटिव्हीमध्ये काम केल्यानंतर अदानी यांनी एनडीटिव्ही टेकओव्हर केल्यामुळे रविश कुमार यांनी आपली नोकरी सोडली, राजीनामा दिला. त्यानंतर त्यांच्या चाहत्यांमध्ये चिंतेचं वातावरण पसरलं, रविश कुमार हे विकले जात नाहीत तर ते स्वाभिमानी आहेत, अशा प्रकारच्या पोस्ट्स फिरु लागल्या. जर रविश यांनी अदानी यांच्याकडे नोकरी स्वीकारली असती तर ते खरोखर विकले गेले असते का? आता त्यांनी राजीनामा दिल्यामुळे त्यांची बाजू मजबूत होते? या राजीनामा नाट्याकडे कशाप्रकारे पाहता येईल?

(हेही वाचा समृद्धी महामार्गावर शिंदे-फडणवीस एकाच गाडीत, स्टेअरिंग मात्र शिंदेंच्या हाती)

रविश कुमार ’पळपुटा’

वाचकांनो, रविश कुमार यांनी राजीनामा दिल्याने मी त्यांना ’पळपुटा’ असं म्हणेन. अनेक वर्षे मीडियावर डाव्या लोकांचा पगडा आहे. अनेक मीडिया हाऊसचे संपादक डावे आहेत. विशेषतः एनडीटिव्हीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात खूप रिपोर्टिंग केली आहे. मोदींना बदनाम करण्यासाठी कॉंग्रेसने आणि तत्सम पक्षांनी एनडीटीव्ही सारख्या चॅनलला पुढे केलं होतं. या डाव्या विचारांच्या पत्रकारांमध्ये उजव्या विचारांच्या पत्रकरांची काय अवस्था झाली असेल याचा कधी विचार केला आहे का?

रविश कुमार क्रांतिकारी असल्याचा आव आणतात

आज भाजपची सत्ता आहे म्हणून या सर्व लोकांना संविधान धोक्यात आल्याचे वाटत आहे. तर इतक्या वर्षात संघ व इतर हिंदुत्ववादी संघटना आणि सामाजिक व राजकीय नेत्यांची, कार्यकर्त्यांची काय अवस्था झाली असेल याचा कधी विचार केला आहे का? या सर्व उजव्या विचारांच्या पत्रकारांनी डाव्या विचारांच्या पत्रकारांसोबत काम केलं, त्यांची मग्रूरी खपवून घेतली, प्रतिकूल परिस्थिती असताना देखील ते उभे राहिले. आणीबाणीच्या काळात उजवे पक्ष आणि संघटनांना किती त्रास सोसावा लागला असेल. तरी कुणीही माघार घेतली नाही. रविश कुमार आपण खूप क्रांतिकारी असल्याचा आव आणतात. परंतु विरोधी विचारांमध्ये राहुन काम करण्याची त्यांची क्षमताच नाही. आपल्या कहई मोजक्या लोकांसोबत काम करुन वाह वाह मिळवायची याची सवय रविश कुमार यांना झाली आहे. उजव्या विचारांच्या लोकांनी खूप सोसलं आहे. याचं उत्तम उदाहरण म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी. नरेंद्र मोदींचा अक्षरशः छळ झाला, तरी एखाद्या फिनिक्स पक्षाप्रमाणे त्यांनी झेप घेतली. रविश कुमार यांनी मोदींना व्हिलन ठरवण्याचा प्रयत्न केला, परंतु भारतीय जनतेने मोदींना आपल्या मनाच्या सिंहासनावर बसवलं.

(हेही वाचा छत्रपती शिवाजी महाराजांवरील वादग्रस्त वक्तव्यांवर राज ठाकरे म्हणाले…)

मैदान सोडून पळून गेले

रविश कुमार यांनी राजीनामा दिला. मैदान सोडून ते पळून गेले. त्यांच्यात विरोध करण्याची देखील क्षमता नाही. या घटनेने ते खूप लहान झाले आहेत. त्यांच्या मोठेपणाचा फुगा फुटला आहे. सहानुभूती मिळवण्याचा त्यांना हा प्रकार अतिशय केवीलवाणा आहे. या  राजीनामा नाट्यातून रविश कुमार यांचा खरा चेहरा समोर आला, म्हणजे रविश कुमार पळपुटे, भित्रे, लहान आणि सर्वसामान्य पत्रकार आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.