Ravneet Singh Bittu : बैठकीची वेळ गाठण्यासाठी जेव्हा भाजपा नेते रस्त्यावर धावू लागतात…

183
बैठकीची वेळ गाठण्यासाठी जेव्हा भाजपा नेते रस्त्यावर धावू लागतात...
बैठकीची वेळ गाठण्यासाठी जेव्हा भाजपा नेते रस्त्यावर धावू लागतात...

पंतप्रधान मोदींच्या मंत्रीमंडळात शपथ घेतलेले भाजप नेते रवनीत बिट्टू (Ravneet Singh Bittu) यांचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ९ जूनच्या शपथविधीपूर्वी सर्व भावी मंत्र्यांना पंतप्रधानांच्या निवासस्थानी आमंत्रित करण्यात आले होते. या बैठकीसाठी जातांना लुधियाना मतदारसंघाचे नेते रवनीत बिट्टू वाहतूक कोंडीत अडकले. त्यानंतर त्यांनी बैठकीची वेळ गाठण्यासाठी जे केले, ते पाहून सगळेच आचंबित झाले आहेत.

(हेही वाचा – Anil Patil: केंद्रात मंत्रीपद नाही, आता विधानसभेसाठी अजितदादा गटाचा ८० जागांवर दावा!)

गाडी वाहतूककोंडीत सापडल्यावर पंतप्रधानांच्या निवासस्थानी जात असतांना त्यांची गाडी वाहतुकीत अडकली. यानंतर बिट्टू गाडीतून बाहेर पडले आणि पंतप्रधानांच्या निवासस्थानाच्या दिशेने धावू लागले. त्यांच्या मागे त्यांचे सुरक्षा कर्मचारी धावू लागले. याचा व्हिडिओही सोशल मीडियावर समोर आला आहे.

रवनीत सिंग बिट्टू (Ravneet Singh Bittu) हे तीन वेळा खासदार राहिले आहेत. मात्र या वेळी त्यांचा पराभव झाला. निवडणुकीपूर्वी त्यांनी काँग्रेस सोडून भाजपात प्रवेश केला होता. ते लुधियानाहून दोन वेळा आणि आनंदपूर साहिबमधून एकदा खासदार राहिले आहेत. लुधियाना मतदारसंघातून काँग्रेसचे अमरिंदर राजा वारिंग यांनी 20,000 हून अधिक मतांच्या फरकाने विजय मिळवला.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.