शेतकऱ्यांच्या फसवणुकीविरुद्ध नाशिक जिल्हा बँकेसमोर एल्गार 

रयत क्रांती संघटनेच्या कार्यकर्त्यांनी नांगरणी आणि बैल जोडी बँकेच्या आवारात आणून बँकेच्या कारभाराचा निषेध केला.

77

जिल्हा मध्यवर्ती बँकेबाहेर रयत क्रांती संघटनेच्या वतीने ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी उपस्थित संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सरकारच्या निषेधार्थ तसेच बँकेच्या कामकाजाविरोधात घोषणाबाजी केली.नाशिक जिल्हा सहकारी बँकेच्या वतीने शेतकऱ्यांची फसवणूक केली जात असून त्यांना कर्जही दिले जात नाही, तसेच ज्यांना कर्जे दिली गेली, त्यांच्याकडून सक्तीने वसुली केली जात आहे. या सगळ्या बँकेच्या कारभाराविरोधात सोमवारी, २८ जून रोजी रयत क्रांती संघटनेच्यावतीने संघटनेचे अध्यक्ष आमदार माजी मंत्री सदाभाऊ खोत यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली द्वारका येथील मुख्य कार्यालय बाहेर ठिय्या आंदोलन करण्यात आले.

(हेही वाचा : पर्यटन बंदीचा आदेश झुगारून पर्यटकांचा हैदोस! )

या मागण्यासाठी केले आंदोलन!

यावेळी रयत क्रांती संघटनेच्यावतीने शेतकऱ्यांना खरीब पिककर्ज त्वरित उपलब्ध करून द्यावे, २०१६ च्या नंतर कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना ५० टक्के व्याज सवलत दिली आहे. त्याची व्याप्ती वाढवावी व २०१६ ते २०२० पर्यंतच्या शेतकऱ्यांना व्याज सवलत मिळावी, छत्रपती शिवाजी महाराज कर्ज मुक्ती झालेल्या शेतकऱ्यांना पिककर्ज मिळावे, ७/१२ तारण ठेवलेल्या व कर्ज फेड करू न शकलेल्या शेतकऱ्यांच्या जमिनीचे लिलाव थांबवावे व त्या शेतकऱ्यांचे कर्ज फेडीसाठी ठराविक अंतराने हप्ते करून द्यावेत. या सह अन्य मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यावेळी रयत क्रांती संघटनेच्या कार्यकर्त्यांनी नांगरणी आणि बैल जोडी देखील बँकेच्या आवारात आणून बँकेच्या कारभाराचा निषेध केला.

या आंदोलनामध्ये प्रदेश अध्यक्ष शिवनाथ जाधव, आमदार देवयानी फरांदे,, बारा बलुतेदार संघटनेचे अध्यक्ष बंडु  बच्छाव, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष दिपक पगार, वाल्मिक सांगळे, जिल्हाध्यक्ष विशाल पवार, जिल्हाध्यक्ष डोंगर अण्णा पगार, भिका बापू धोंडगे, रमेश बापू अहिर, युराज देवरे आदिंसह  अन्य कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.