रझा अकादमीचे मूळ तालिबानमध्ये! – नितेश राणेंचा आरोप

67

मोर्चा काढण्याचे कारण सत्य नसताना रझा अकादमीने मोर्चा काढला तरी कसा? मुद्दा अस्तित्वातच नसताना राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था हातात घेण्यात आली. राज्यातील मंत्री यावर काहीच बोलत नाहीत. रझा अकादमी ही एक अतिरेकी संघटना आहे. त्यांच्या स्थापनेपासूनच त्यांचे विचार आणि कार्यप्रणालीही कट्टरपंथीय राहिली आहे. कट्टरपंथीयांचा समाजाशी काय संबंध? या संघटनेचे मूळ तालिबानमध्ये आहे. याच रझा अकादमीने ट्रिपल तलाकला विरोध केला होता. याच संघटनेने व्हॅक्सिनलाही विरोध केला होता. तरीही ही संघटना महाराष्ट्रात कार्यरत आहे. त्यावर कोणी काहीच कसे बोलत नाही? असा सवाल भाजपाचे नेते नितेश राणे यांनी केला.

रझा अकादमीच्या अध्यक्षाला अटक करा

राज्यात दंगली झाल्या. त्याला रझा अकादमीच जबाबदार असल्याचे उघड झाले आहे. तरीही रझा अकादमीच्या एकाही माणसाला अटक होत नाही. सर्व मर्दानगी आमच्यावर का दाखवली जाते? हिंमत असेल तर रझा अकादमीच्या अध्यक्षांना अटक करून दाखवा, असे आव्हानच राणे यांनी महाविकास आघाडीला दिले आहे. राज्यात एवढी मोठी दंगल होते. हे महाराष्ट्राच्या इंटेलिजन्सचे फेल्युअर नाही का? असा सवाल करतानाच आमचा सरकारवर विश्वास नाही. येणाऱ्या काळात आम्ही केंद्रीय गृहमंत्री आणि एनआयएशी याबाबत चर्चा करणार आहोत, असेही राणे त्यांनी सांगितले.

(हेही वाचा : शरद पवारांनी एसटी कर्मचाऱ्यांना ‘हा’ दिला इशारा)

नांदेडमध्ये मोर्चाचे पोस्टर लागले होते

महाराष्ट्रात जे काही सुरू आहे त्यावर महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून जाणीवपूर्वक घाणेरडे राजकारण सुरू आहे. चुकीचे नरेशन सेट केले जात आहे. राज्याचे गृहमंत्री आणि अन्य मंत्र्यांची विधाने पाहा. हिंदू संघटनांमुळेच मोर्चे निघाला आणि त्यातून दंगल झाल्याचे चित्रे उभे केले जात आहे. विश्व हिंदू परिषद, आरएसएस आणि भाजपमुळे दंगल झाल्याचे सांगण्याचा वारंवार प्रयत्न केला जात आहे. आता 13 नोव्हेंबरच्या आधी काय घडले हे सांगायला लागेल. 12 नोव्हेंबरला नांदेडमध्ये मोर्चा निघाला. हा केवळ मोर्चा नव्हता. तो सुनियोजित मोर्चा होता. त्याचे आधीच सगळीकडे पोस्टर लागले होते, असा दावा राणे यांनी केला.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.