Waqf amendment bill मंजूर झाल्यानंतर रझा अकादमीने थेट सरकारलाच दिली धमकी

रझा अकादमीचे मौलवी खलिदी रहमान नूर यांनी म्हटले की, वक्फ विधेयक (Waqf amendment bill) मंजूर झाल्यानंतर जे जल्लोष करतायेत ते संघाच्या इशाऱ्यावर नाचणारे आहेत. ते त्यांनी पाळलेले कुत्रे आहेत.

232

काँग्रेसने एक गठ्ठा मतांच्या राजकारणासाठी मुसलमानांच्या वक्फ बोर्डाला अमर्याद अधिकार दिले, ज्यामुळे मुसलमानांनी लँड जिहाद सुरु केला. मोठ्या प्रमाणात खासगी आणि सरकारी जमिनी हडपण्याचे सत्र सुरु केले. त्यामुळे यावर अंकुश आणण्यासाठी केंद्र सरकारने वक्फ सुधारणा विधेयक (Waqf amendment bill) आणले आणि ते संसदेत मंजूर केले. मात्र यानंतर आता मुसलमानांच्या संघटनांची वळवळ सुरु झाली आहे. रझा अकादमीने तर थेट सरकारला धमकी दिली, आम्ही हे विधेयक मान्य करत नाही, आम्ही  रस्त्यावर उतरू असा इशारा दिला आहे.

(हेही वाचा Waqf amendment Bill : लोकसभेनंतर राज्यसभेतही वक्फ सुधारणा विधेयक 128 मतांनी संमत)

रझा अकादमीचे मौलवी खलिदी रहमान नूर यांनी म्हटले की, वक्फ विधेयक (Waqf amendment bill) मंजूर झाल्यानंतर जे जल्लोष करतायेत ते संघाच्या इशाऱ्यावर नाचणारे आहेत. ते त्यांनी पाळलेले कुत्रे आहेत. भारतातील ९९ टक्के मुसलमान या विधेयकामुळे नाराज आहे. हा आमचा धार्मिक प्रश्न असून आम्ही त्यासाठी कुठल्याही कुर्बानीसाठी तयार आहोत. आम्ही हे मान्य करणार नाही. आम्ही रस्त्यावर उतरू, सर्वोच्च न्यायालयात जाऊ. जितका विरोध असेल तितका करू. नरेंद्र मोदी, अमित शाह खोटारडे आहेत. जर आमच्या भल्यासाठी काम करत असते तर आम्हालाही विश्वासात घेतले असते, चर्चा केली असती. गरीब मुसलमानांसाठी नव्हे तर स्वत:साठी आणि त्यांच्या मित्रांसाठी काम केले जात आहे असे त्यांनी सांगितले. त्याशिवाय जेव्हापासून संसदेत वक्फ सुधारणा विधेयकासाठी (Waqf amendment bill) संयुक्त संसदीय समिती बनली तेव्हापासून आम्ही याचा विरोध करत आहोत. मरेपर्यंत आम्ही आंदोलन करत राहू. बिहारच्या निवडणुकीत नितीश कुमारांना यंदा चांगलाच धडा मिळेल. मुसलमान त्यांना धडा शिकवेल. नितीश कुमार यांच्याकडून आम्हाला अपेक्षा होती. मात्र हे विधेयक मंजूर करण्यात त्यांचा वाटा आहे, असेही मौलाना नूर म्हणाले.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.