त्रिपुरातील घटनेच्या विरोधात महाराष्ट्रात मुसलमानांची हिंसा

109

त्रिपुरात मुस्लिमांना मारहाण करण्यात आल्याने आरोपीवर कठोर कार्यवाही करण्यात यावी, या मागणीसाठी रझा अकादमीने महाराष्ट्रात आंदोलन केले. त्यावेळी राज्यातील विविध जिल्ह्यांत मुसलमानांनी हिंसा केली. त्याचे तीव्र पडसाद राज्यात उमटले. धर्मांध मुसलमानांनी राज्यभर रॅली काढली, त्यावेळी अनेक दुकानांची तोडफोड केली, तर अनेक दुकाने जबरदस्तीने बंद केली.

नांदेड – नांदेड शहरात धर्मांध मुसलमानांनी शिवाजीनगर, केळी मार्केट, देगलूर नाका परिसरात तुफान दगडफेक केली. दगडफेकीत दोन पोलिस कर्मचारी गंभीर जखमी झाले. व्यावसायिकांचे दुकाने आणि खासगी वाहनांसह पोलिसांच्या वाहनांचीही तोडफोड करण्यात आली. त्यामुळे दंगल नियंत्रण पथक तैनात करण्यात आले आहे. दगडफेक करतानाची दृश्ये सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहेत.

मालेगाव – त्रिपुरातील घटनेच्या निषेधार्थ मुस्लिम समाजाने बंद पाळला होता. या बंदलाही गालबोट लागले. प्रशासकीय अधिकाऱ्यांना निवेदन देण्यासाठी मोठा जनसमुदाय निघाला होता. यावेळी काही ठिकाणी जमावाने दगडफेक केली. त्यामुळे जमावावर पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला.

(हेही वाचा : संप मागे घ्या! ‘लालपरी’ आर्थिक संकटात आहे; ‘एसटी’कडून भावनिक आवाहन)

भिवंडी – मुसलमानांनी भिवंडीत  बंद पुकारला. त्यावेळी शहरातल्या बाजारपेठा बंद ठेवण्यात आल्या. भिवंडीतल्या बंदला एमआयएम, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि समाजवादी पक्षाने पाठिंबा दिला.

अमरावती – अमरावतीत निघालेल्या मोर्चाची कुठलीही परवानही घेण्यात आली नव्हती, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. मोर्चेकऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असेही पोलिस उपायुक्त विक्रम साळी यांनी म्हटले.

हिंगोली – हिंगोलीत मुसलमानांनी दुकाने बंद ठेऊन निषेध व्यक्त केला. शहरातील भाजिमंडी परीसरात शुकशुकाट बघायला मिळाला. जिल्हयातील कलमनुरी शहरात देखील आपली अस्थापने बंद ठेवून निषेध नोंदवला.  जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोठ्या संख्येने मुसलमानांनी निषेधात सहभागी झाले होते. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी कडेकोट पोलिस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला होता.

भाजपचे अमरावती बंद

शुक्रवारी, 12 नोव्हेंबर रोजी अमरावती शहरात संघटीत गुन्हेगारीने नंगा नाच घालून शहरात लूटमार, तोडफोड आणि दगडफेक केली. पोलिस यंत्रणा मूकदर्शक बनली होती. संपूर्ण अमरावती शहर प्रचंड दहशतीत होते. शहराला वाचवण्यासाठी राज्य शासनाच्या सर्व यंत्रणा अपयशी ठरल्या. परिणामी मुस्लिम समाजाने काढलेला मोर्चा लोकशाहीची पायमल्ली करणारा ठरला. आम्ही या मोर्चाचा निषेध करतो. भारतीय जनता पार्टी अमरावती जनतेच्या पाठीशी उभी आहे. कालच्या मोर्चाच्या संघटीत गुन्हेगारी निषेधार्थ उद्या शनिवार, 13 नोव्हेंबर रोजी भाजपाने ‘अमरावती बंद’ चे आवाहन केले आहे. सर्व व्यापारी बंधूंनी दुपारी 4 वाजेपर्यन्त दुकाने बंद ठेवावी अशी विनंती भारतीय जनता पार्टी करत आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.