त्रिपुरातील कथित हिंसाचारप्रकरणाचा निषेध करण्यासाठी महाराष्ट्रातही धर्मांध मुसलमानांनी मोर्चे, निदर्शने केली. अमरावती, मालेगाव, नांदेड, हिंगोली, परभणी या ठिकाणी निषेध मोर्चे काढण्यात आले, तेव्हा त्यात मोठी गर्दी उसळल्याचे पाहायला मिळाली. यातील अमरावती, मालेगाव, नांदेड या शहरांत मोर्चाला हिंसक वळण लागले. मोर्चेकऱ्यांनी अनेक दुकानांची तोडफोड केली असून पोलिसांनाही काही ठिकाणी लक्ष्य करण्यात आले. गुरुवारी राज्यात तणावपूर्ण शांतता असली तरी याप्रकरणी सरकारच्या हेतूवर शंका घेण्यात आली आहे. अशा प्रक्रारे मोर्च्यांना पोलिसांनी परवानगी का दिली? मालेगावात विना परवानगी मोर्चा काढला तेव्हाच पोलिस कारवाई का झाली नाही? असे प्रश्न आता विचारण्यात येऊ लागले आहेत. दिवसभर धर्मांध मुसलमानांनी धुडगूस घातल्यावर सायंकाळी गृहमंत्री दिलीप वळसे – पाटील आणि गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी पोलिसांना आदेश देण्यास सुरुवात केल्याचे समजते.
काय म्हणजे गृहमंत्री?
गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी राज्यातील परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर राज्यातील जनतेला शांतता व संयम राखण्याचे आवाहन केले. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही यासाठी पोलिस प्रशासनाने दक्ष राहावे, तसेच, राज्य सरकार पूर्णपणे परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. नागरिकांनी कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. संयम बाळगावा. या प्रकरणामध्ये जे कोणी दोषी आढळतील त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल. या परिस्थितीत आपण सगळ्यांनी सामाजिक ऐक्य राखणे आवश्यक आहे आणि त्या दृष्टीकोनातून सगळ्यांनी सहकार्य करावे, अशी विनंती गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केली.
त्रिपुरातील कथित घटनांचे भांडवल करून अमरावती, नांदेड आणि मालेगाव येथे मोठ्या संख्येने निघालेले मोर्चे आणि त्यातून घडलेले दगडफेक, तोडफोड, हिंसेचे प्रकार अतिशय चिंताजनक आहेत. राज्य सरकारने त्वरित याची दखल घेऊन परिस्थिती नियंत्रणात राहील, याची खबरदारी घ्यावी.
– देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते
(हेही वाचा : त्रिपुरातील घटनेच्या विरोधात महाराष्ट्रात मुसलमानांची हिंसा)
काय म्हणाले गृहराज्यमंत्री देसाई?
मालेगाव, नांदेड, भिवंडी आणि अमरावतीत मुस्लिम बांधवांची माथी भडकवून हिंसाचार घडवणाऱ्यांवर कारवाई करा. वातावरण चिघळवणाऱ्या एकाही समाजकंटकाला सोडू नका, सरकारने या घटनेची गंभीरपणे देखल घेतली आहे. काही समाजकंटक वातावरण भडकवत असतात त्यांना सोडू नका. त्यांच्यावर कठोर कारवाई करा, असे आदेश देण्यात आले आहेत, असे आदेश पोलिस महासंचालक (कायदा आणि सुव्यवस्था) यांना दिले असल्याचे गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई म्हणाले.
१० पोलिस दगडफेकीत जखमी
मालेगावमध्ये बंद पुकारण्यात आला होता. पण, या बंदला हिंसक वळण मिळाले. जमावाने केलेल्या दगडफेकीमध्ये 3 पोलिस अधिकारी, 7 कर्मचारी आणि 2 नागरिक जखमी झाले आहे.
Join Our WhatsApp Community