गनिमी काव्यानं शिवतीर्थावरच होणार दसरा मेळावा, शिवसेनेचं ओपन चॅलेंज

मुंबईतील शिवतीर्थावर दसरा मेळावा घेण्यासाठी ठाकरे गट आणि शिंदे गट या दोघांनागी मुंबई महापालिकेने परवानगी नाकारली आहे. यावर मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर आणि शिवसेनेचे गटनेते अजय चौधरी यांनी आक्रमक प्रतिक्रिया देत शिवसेनेकडून ओपन चॅलेंज दिले आहे. दरम्यान, शिवसेनेचा दसरा मेळावा गनिमा काव्याने शिवतीर्थावरच होणार असे सांगत शिंदे गटाला खुलं आव्हान दिले आहे. तर पेडणेकर यांनी शिंदे गट रडीचा डाव खेळत आहेत, हा डाव भाजपच्या माध्यमातून खेळला जातोय, अशी प्रतिक्रिया दिली आहे.

(हेही वाचा – शिवतीर्थावरील दसरा मेळाव्यासंदर्भातील सुनावणी पुढे ढकलली, उच्च न्यायालयात या दिवशी होणार निर्णय)

मुंबई महापालिकेने शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्याची परवानगी नाकारल्यानंतर शिवसेनेची आक्रमक भूमिका पाहायला मिळत आहे. महापालिकेच्या निर्णयानंतर पेडणेकरांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी शिवसेनेच्या दसरा मेळाव्यास परवानगी नाही मिळाली तर तो गनिमी काव्याने शिवतीर्थावरच होईल, असे सांगत शिंदे गटावर निशाणा साधला.

तर शिंदे गटाला वांद्रे-कुर्ला कॉम्पलेक्समध्ये परवानगी मिळालेली असतानाही ते शिवाजी पार्कवर दसरा मेळावा व्हावा, यासाठी परवानगी मागत आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेबांना मानायचं मात्र शिवसेनेची गळचेपी करायची, पक्षातील दलबदलू लोकं आज आमदार-खासदार झाले. ते बाळासाहेबांचे विचार काय पुढे नेणार… शिंदे गट सध्या भाजपाचीच स्क्रिप्ट वाचत आहे. भाजपमध्ये सुद्धा अनेक चेहरे आहेत, पण त्यांच्या नावाने मतं मिळणार नाही, असं जेव्हा त्यांना वाटायला लागलं तेव्हा बाळासाहेबांचे विचार पुढे केले जात असल्याचा आरोप पेडणेकर यांनी शिंदे गटावर केला आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here