पूर्ण क्षमतेने महायुतीतून निवडणूक लढण्यासाठी सज्ज; Sunil Tatkare यांचे संकेत

82
पूर्ण क्षमतेने महायुतीतून निवडणूक लढण्यासाठी सज्ज; Sunil Tatkare यांचे संकेत
  • प्रतिनिधी

आगामी विधानसभा निवडणुकीत अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीतून बाहेर पडून स्वतंत्र निवडणूका लढवणार असे विविध अंदाज येथील राजकीय निरीक्षक मोठ्या दाव्याने करत असतानाच, मंगळवारी (१५ ऑक्टोबर) प्रसार माध्यमांशी बोलताना राष्ट्रवादी काँग्रसचे प्रदेशाध्यक्ष व खा. सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांनी मात्र पक्ष महायुतीच्याच माध्यमातून पूर्ण क्षमतेने निवडणूका लढवण्यासाठी सज्ज झाल्याचे वक्तव्य करत तसे स्पष्ट संकेत तर दिलेच पण भल्या भल्या राजकीय पंडितांनाही चांगलेच तोंडावर आपटले.

त्याचे झाले असे की, मंगळवारी केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्र आणि झारखंड या दोन राज्यातील निवडणूका जाहीर केल्या. त्यात २० नोव्हेंबरला मतदान तर २३ नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. २०१९ मध्ये एकाच टप्प्यात मतदान झाले होते आणि आताही एकाच टप्प्यात महाराष्ट्राचे मतदान होणार असल्याचेही आयोगाने यावेळी ठामपणे नमूद केले. त्यावर प्रतिक्रिया घेण्यासाठी प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांना मंत्रालयासमोरील पक्ष कार्यालयात गाठले. त्यावेळी आता काहीतरी वेगळी बातमी मिळेल असा तर्क बांधलेल्या प्रतिनिधींनी खा. तटकरे यांच्याकडे निवडणुकीसंदर्भात विचारणा केली असता त्यांनी तर थेट आपला पक्ष महायुतीच्याच माध्यमातून निवडणूक लढण्यासाठी सज्ज झाल्याचे स्पष्ट संकेत देत राष्ट्रवादी काँग्रेस विषयी विविध अफवा व चर्चांना पूर्णविराम दिला.

(हेही वाचा – Maharashtra Assembly Election : ‘पिपाणी’ चिन्ह शरद पवार गटासाठी विधानसभा निवडणुकीतही ठरणार डोकेदुखी)

खा. तटकरे (Sunil Tatkare) म्हणाले की, आता अधिक गतीने उरलेल्या जागावाटपांचा निर्णय येत्या दोन दिवसात होईल. याचे नियोजन आज आणि उद्या एकत्र बसून करणार आहोत. महायुती म्हणून २८८ जागांवर बुथनिहाय महायुतीतील पक्ष व घटकपक्ष यांची ताकद एकत्रितपणे कशी करता येईल यादृष्टीने विधानसभा निहाय निरीक्षक नेमलेले असून आता या सर्व कामाला गती द्यावी लागणार असल्याचेही खा. तटकरे यांनी ठामपणे नमूद केले.

यावेळी खा. तटकरे (Sunil Tatkare) यांनी विरोधकांचाही आपल्या खास शैलीत खरपूस समाचार घेतला. विरोधकांना फक्त टिकाटिप्पणी करायची असून लोकांच्या मनात संभ्रमाची भावना निर्माण करायची आहे, असा थेट आरोप करत, लोकसभेत जसा खोटा प्रचार करण्यात यशस्वी झाले तसा खोटा प्रचार करण्याचा प्रयत्न आता करतील आणि महाराष्ट्रात निवडणूका होणार नाही असाही खोटा प्रचार आताही निर्माण केला. परंतु संविधानाने सारा देश बांधला गेला आहे…जोडला गेला आहे. त्यामुळेच निवडणूक आयोगाने २६ नोव्हेंबरच्या आत राज्यात सरकार अस्तित्वात यायला हवे हे कायद्याने बंधनकारक असल्याचे स्पष्ट करत, आम्ही संविधानाच्याच आधारे काम करत आहोत. मात्र आवई उठवणे… खोटा प्रचार करणे हा विरोधकांचा एककलमी कार्यक्रम आहे असाही सणसणीत टोला खा. तटकरे यांनी विरोधकांना लगावला.

(हेही वाचा – Engineering Recruitment : महापालिकेत ६९० कनिष्ठ आणि दुय्यम अभियंत्यांच्या रिक्त जागांसाठी भरती, ११ नोव्हेंबरपासून अर्ज मागवणार)

निवडणूक आयोगाने प्रचारासाठी दिलेला वेळ हा नक्कीच पुरेसा असून २८८ जागांवर पहिल्यांदाच निवडणूका होत आहे असे नाही. तारखा ठरवण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने मध्यंतरी मुंबईत सर्व राजकीय पक्षांची बैठक घेतली होती. त्यावेळी सर्वच पक्षांनी दिवाळी हा चार दिवसांचा सण असल्याचे आयोगाच्या निदर्शनास आणून देत त्यानंतरच्या तारखा असाव्यात अशी मागणी केली होती. त्यामुळे निवडणूक आयोगाने घेतलेला निर्णय योग्यच असल्याचे ठाम स्पष्टीकरणही खा. तटकरे (Sunil Tatkare) यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना दिले.

राज्यात १९९५ मध्ये सर्वाधिक ४५ अपक्ष निवडून आले होते. त्यानंतर दर निवडणुकीत अपक्ष उमेदवारी लढण्याची संख्या वाढतच गेली. यावेळीही अपक्ष उमेदवारी दाखल होऊ शकतात. त्यामुळेच जवळपास बर्‍याच मतदारसंघात भावी आमदार म्हणून लागणारे बॅनर बघितले तर एका मतदारसंघात दहा भावी आमदारांची संख्या पहायला मिळत आहे, असे सांगत एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रसिद्धीबरोबर प्रचार केला जात आहे याचा अर्थ तेही निवडणूक लढू शकतात. मात्र आमच्या महायुतीतील कुठलेही कार्यकर्ते आपल्या उमेदवाराच्या विरोधात भूमिका घेणार नाहीत, याची दक्षता घेतली जाणार आहे, अशीही ठाम भूमिका खा. तटकरे (Sunil Tatkare) यांनी यावेळी मांडली.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.