केशव उपाध्ये यांची भारतीय जनता पार्टीच्या मुख्य प्रवक्तेपदी फेरनियुक्ती करण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची शुक्रवारी त्यासंदर्भात घोषणा केली. नवनाथ बन यांच्याकडे माध्यम प्रमुख पदाची जबाबदारी सोपविण्यात आली असून, विश्वास पाठक आणि अजित चव्हाण हे मुख्य सहप्रवक्ते राहतील.
( हेही वाचा : शिवसेना कुणाची? निवडणूक आयोगासमोरील सुनावणी 30 जानेवारीपर्यंत स्थगित)
उपाध्ये हे गेल्या २० वर्षांहून अधिक काळ भाजपात कार्यरत आहेत. तत्कालिन प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी २०१४ मध्ये प्रथम त्यांच्या टीममध्ये प्रवक्ते म्हणून उपाध्ये यांची नियुक्त केली. अभ्यासू वृत्ती, पत्रकारीतेची पार्श्वभूमी आणि पक्की वैचारीक बैठक याबरोबरच राजकीय व सामाजिक जाण यातून त्यांनी प्रवक्ते म्हणून अल्पावधीतच छाप पाडली आहे . सर्व मराठी तसेच हिंदी, राष्ट्रीय वृत्त वाहिन्यांवर अभ्यासपूर्ण शैलीत आक्रमकपणे पक्षाची बाजू मांडून त्यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली.
‘अभाविप’ ची पार्श्वभूमी असलेले उपाध्ये यांनी पुण्याच्या रानडे इस्ट्यिट्यूट येथून पत्रकारिता अभ्यासक्रम पूर्ण केला. दै. पुढारी, दै. लोकसत्ता, मुंबई तरूण भारत या दैनिकांत त्यांनी काम केले आहे. उपाध्ये यांनी वृत्तपत्रे, ब्लॉग, तसेच समाज माध्यमातून पक्षाची बाजू मांडणारे लेखन तसेच सामाजिक आणि ललित विषयांवर देखील विपुल लेखन केले आहे. रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीच्या दोन अभ्यास गटांत त्यांचा समावेश होता. नक्षल चळवळीचा छ्त्तीसगडच्या विकासावर होणारा विपरित परिणाम यावर २००६ साली संशोधनात्मक अभ्यास करून अहवाल तयार केला. हा अहवाल प्रबोधिनीने प्रसिद्ध केला. सोलापूर येथील दंगलीनंतर प्रबोधिनीने पाठवलेल्या सत्यशोधन समितीमध्येही त्यांचा सहभाग होता.
भाजपाचे नवे प्रवक्ते
1. आ.प्रा.राम शिंदे
2. आ.राम कदम
3. आ.अमित साटम
4. भालचंद्र शिरसाट
5. शिवराय कुलकर्णी
6. श्वेता शालिनी
7. गणेश खणकर
8. अॅड.राजीव पांडे
9. कु. प्रेरणा होनराव
पॅनेलिस्ट सदस्य
1. खा.डॉ. अनिल बोंडे (अमरावती)
2. आ.निरंजन डावखरे (ठाणे)
3. आ.प्रवीण दटके (नागपूर)
4. आ.सिध्दार्थ शिरोळे (पुणे)
5. आ.श्वेता महाले (बुलढाणा)
6. गणेश हाके (लातूर)
7. अवधूत वाघ (मुंबई)
8. राम कुलकर्णी (बीड)
9. प्रवीण घुगे (संभाजीनगर)
10. धर्मपाल मेश्राम (नागपूर)
11. लक्ष्मण सावजी (नाशिक)
12. मिलींद शरद कानडे (नागपूर)
13. विनोद वाघ (वाशिम)
14. असिफ भामला (मुंबई)
15. मकरंद नार्वेकर (मुंबई)
16. प्रदीप पेशकार (नाशिक)
17. दिपाली मोकाशी (मीरा भाईंदर)
18. विनायक आंबेकर (पुणे)
19. शिवानी दाणी (नागपूर)
20. अॅड.आरती साठे (मुंबई)
21. प्रो.आरती पुगांवकर (मुंबई)
22. नितीन सुरेश दिनकर (अहमदनगर)
23. प्रिती गांधी (मुंबई)
24. राणी द्विवेदी-निघोट (मुंबई)
25. श्वेता परुळकर (मुंबई)
26. राम बुधवंत (संभाजीनगर)
27. अली दारुवाला (पुणे)
28. चंदन गोस्वामी (नागपूर)
29. आशिष चंदारमा (अकोला)
30. देवयानी खानखोजे (मुंबई)
31. मृणाल पेंडसे (ठाणे)