एकनाथ शिंदे पहिल्यांदाच हॉटेलबाहेर, सत्तास्थापनेबाबत केलं मोठं विधान

80

शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे हे सध्या गुवाहटीतील हॉटेल रेडिसन ब्लूमध्ये आपल्या गटातील आमदारांसह राहत आहेत. ट्विटर आणि व्हिडिओच्या मध्यमातून एकनाथ शिंदे आपली भूमिका मांडत असताना मंगळवारी पहिल्यांदाच ते हॉटेलबाहेर आले आहेत. यावेळी त्यांनी माध्यमांना पहिल्यांदाच समोरासमोर प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी आपण लवकरच मुंबईला येणार असल्याचे एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले आहे. तसेच सत्तास्थापनेबाबतची आपली भूमिकाही लवकरच सांगणार असल्याचे एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.

काय म्हणाले शिंदे?

गेल्या आठवडाभरापासून एकनाथ शिंदे आणि त्यांच्या समर्थनार्थ असलेले आमदार हे रेडिसन ब्लूमध्ये असून, एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी दुपारी हॉटेलमध्ये बाहेर येऊन पहिल्यांदाच माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. काळजी करू नका, आम्ही लवकरच मुंबईत परत येणार आहोत, असे एकनाथ शिंदे यांनी माध्यमांना सांगितले. तसेच दीपक केसरकर हे आमच्या शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते असून ते वेळोवोळी माध्यमांसमोर आमची भूमिका स्पष्ट करत आहेत. राज्यात सत्ता स्थापन करण्याबाबतची आमची भूमिकाही केसरकर यापुढे माध्यमांना सांगतील, असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.

(हेही वाचाः … तर ‘मविआ’नं योग्य तो निर्णय घ्यावा, मुनगंटीवारांनी दिला सल्ला)

आमदार स्वतःच्या मर्जीने गटात सामील

तसेच शिंदे गटातील आमदारांना बळजबरीने आणले असल्याचा आरोप करण्यात येत आहेत. पण या आरोपांमध्ये कुठलेही तथ्य नसून शिंदे गटात सहभागी झालेले आमदार हे स्वतःच्या मर्जीने आले असल्याचे एकनाथ शिंदे यांनी माध्यमांना स्पष्टपणे सांगितले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.