बंडखोरी सहन केली जाणार नाही; Amit Shah यांचा इच्छुकांना सज्जड दम

149
बंडखोरी सहन केली जाणार नाही; Amit Shah यांचा इच्छुकांना सज्जड दम
बंडखोरी सहन केली जाणार नाही; Amit Shah यांचा इच्छुकांना सज्जड दम
राज्यातील सत्तारूढ महायुती आणि भाजपाने उमेदवारी जाहीर केल्यानंतर पक्षातील नेत्यांनी बंडखोरी केल्यास ते कोणत्याही परिस्थितीत सहन केले जाणार नाही, असा सज्जड दम केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी मंगळवारी येथे पदाधिकाऱ्यांना दिला.
केंद्रीय गृहमंत्री मंगळवारी भाजपाच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी नागपूरमध्ये आले होते. त्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून बैठकीला सुरुवात करण्यात आली. विधानसभेच्या आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने शहा यांनी कार्यकर्त्यांना रणनीतीबाबत मार्गदर्शन करताना सज्जड दम दिला. (Amit Shah)
राज्य विधानसभेच्या निवडणुकांची घोषणा पुढील आठवड्यातच होण्याची शक्यता असल्याने सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले असून, राष्ट्रीय पक्षांचे नेते राज्यातील नेत्यांसमवेत बैठका घेऊन रणनीती ठरवत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून मंगळवारी शहा यांनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. (Amit Shah)
भाजपाला विदर्भच ही निवडणूक जिंकून देणार आहे, मतदारसंघात गटबाजी सहन केली जाणार नाही, उमेदवारी मिळाली नाही म्हणून नाराजी हे प्रकार सहन केले जाणार नाहीत. काही दिवसांत सणासुदीचे दिवस येत आहेत. कार्यक्रम आणि उत्सवासाठी लोक एकत्र येतात. त्यामुळे विजयादशमीपासून धनत्रयोदशीपर्यंत प्रत्येक बुथवर तरुण कार्यकर्त्यांनी फिरले पाहिजे, असेही त्यांनी सांगितले. (Amit Shah)
विदर्भात ४५ जागांचे टार्गेट
कोणाला कोणती जागा मिळणार हे अद्याप निश्चित नसलं तरी तयारी मात्र मोठ्या प्रमाणावर सुरु आहे.या पार्श्वभुमीवर नागपूरमध्ये केंद्रीय मंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्या नेतृत्वात मेळावा पार पडला. यावेळी अमित शाह यांना कार्यकर्त्यांना कानमंत्र दिला. ‘शरद पवार (Sharad Pawar) यांना रोखायचं असेल तर विदर्भात ४५ जागा जिंका. विदर्भ जिंकला तरच महाराष्ट्र जिंकू’ असं शाह यांनी म्हंटलं आहे.
प्रत्येक बुथवर १० टक्के मतदान वाढवा
मतदारसंघातील बुथवर विशेष लक्ष देताना प्रत्येक बुथवर मतदानाची टक्केवारी किमान १० टक्के कशी वाढेल यासाठी प्रयत्नशील राहावे, असे त्यांनी पदाधिकाऱ्यांना सांगितले. नेते हेही पक्षाचे कार्यकर्ते आहेत याची त्यांनी जाणीव ठेवावी, केवळ कार्यकर्त्यांवर जबाबदारी टाकून भागणार नाही, प्रत्यक्ष बुथवर जाऊन काम करावे लागेल, तेथे असलेल्या विरोधी पक्षांच्या कार्यकर्त्यांवरही लक्ष ठेवावे लागेल, अशा सूचनाही गृहमंत्र्यांनी दिल्या. (Amit Shah)
शहा नागपूरमध्ये, गडकरी काश्मीरमध्ये
विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) सक्रिय राहतील आणि त्यांच्या नेतृत्वाखाली प्रचार केला जाईल, असे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी अलीकडेच जाहीर केले होते. मात्र अमित शहा मंगळवारी नागपूरमध्ये असतानाच नितीन गडकरी (Nitin Gadkari) हे काश्मीरला गेल्याने राजकीय वर्तुळात दिवसभर उलटसुलट चर्चा सुरू होती. त्यामुळे दोन्ही नेत्यांचे दौरे पूर्वनियोजित होते, अशी सारवासारव अखेर भाजपला करावी लागली. (Amit Shah)
मोदींचा गुरुवारी पुणे दौरा 
पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) हे २६ सप्टेंबर रोजी पुणे दौऱ्यावर येणार आहेत. पुण्यातील एस.पी. कॉलेजच्या मैदानावर त्यांची सभाही होणार आहे. या सभेसाठी जय्यत तयारी सुरू आहे. मात्र, मंगळवारी झालेल्या मुसळधार पावसानंतर एस.पी. कॉलेजच्या मैदानावर पाणी साचले असून मोठ्या प्रमाणात चिखल झाला आहे. (Amit Shah)
हेही पहा-  
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.