बंडखोर आमदारांचे विधानसभा उपाध्यक्षांविरोधातही ‘बंड’, अविश्वास प्रस्ताव आणणार

166

न भूतो न भविष्यती अशी परिस्थिती सध्या राज्याच्या राजकारणात पहायला मिळत आहे. एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यानंतर आता शिवसेनेकडून बंडखोर आमदारांची उमेदवारी रद्द करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. त्यासाठी विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांना शिवसेनेकडून पत्रही देण्यात आले. पण त्याचबाबत आता शिंदे गटाकडून मोठी खेळी खेळण्यात आली आहे. विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्याविरोधातच अविश्वास प्रस्ताव बंडखोर आमदार आणणार आहेत. बंडखोर आमदारांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

त्यामुळे उपाध्यक्षांविरोधातच अविश्वास ठराव आणल्यामुळे त्यांना आता आमदारांवर कोणतीही कारवाई करण्यात येणार नाही, असे पत्र अपक्ष आमदार विनोद अग्रवाल आणि महेश बालदी यांनी विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांना दिले आहे.

(हेही वाचाः ‘फक्त वीट येऊन चालणार नाही, वीट हाणावी लागेल’, मुख्यमंत्री संतापले)

उपाध्यक्षांना पत्र

आम्ही महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य आहोत. 2019 ची निवडणूक आम्ही स्वबळावर निवडून आलो आहोत. शिवसेनेच्या काही आमदारांचं सदस्यत्व रद्द करण्याची मागणी विधानसभा उपाध्यक्षांकडे करण्यात आली आहे. पण घटनेच्या 10व्या परिशिष्टानुसार, पिठासीन अध्यक्षांच्या विरोधात अविश्वास ठराव असेल तर ते आमदारांचं सदस्यत्व रद्द करण्याचा निर्णय घेऊ शकत नाहीत. ज्या आणदारांचं सदस्यत्व रद्द करण्याची मागणी केली जात आहे, त्या आमदारांना उत्तर देण्यासाठी 7 दिवसांचा वेळ देणं बंधनकारक आहे. अशा परिस्थितीत उपाध्यक्षांनी आमदारांचे निलंबन करण्याचा निर्णय घेतला तर तो योग्य नसल्याचे पत्र अपक्ष आमदार महेश बालदी आणि विनोद अग्रवाल यांनी नरहरी झिरवळ यांना देण्यात आले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.