एकनाथ शिंदे यांच्यासह 40 आमदारांनी केलेल्या बंडामुळे शिवसेनेत उभी फूट पडली आहे. त्यामुळे आता राज्यातील शिवसैनिक आक्रमक झाले असून त्यांनी बंडखोर आमदारांच्या कार्यालयाची तोडफोड करायला सुरुवात केली आहे. त्यामुळे आता बंडखोर आमदारांच्या कुटुंबीयांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे 40 पैकी 12 आमदारांनी आता राज्यपालांना पत्र लिहून राष्ट्रपती राजवटीसाठी शिफारस केली आहे. या पत्राची राज्यपालांकडून दखल घेण्यात आली असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. त्यामुळे राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
राज्यपालांना पत्र
बंडखोर शिवसेना आमदारांच्या बंडानंतर राज्यातील शिवसैनिक आता चांगलेच आक्रमक झाले असून त्यांनी ठिकठिकाणी आमदारांच्या कार्यालयांची तोडफोड करायला सुरुवात केली आहे. याची दखल घेत आता आमदारांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. आमच्या कुटुंबीयांची सुरक्षा धोक्यात आली असल्याचे पत्र 12 आमदारांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पाठवले आहे. त्यामुळे या पत्रावर आता राज्यपाल काय निर्णय घेतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
(हेही वाचाः ‘बंडखोर आमदारांचे असंख्य बाप आहेत’, राऊतांची जीभ घसरली)
सुरक्षेत वाढ
शिंदे यांच्यासोबतच बंडखोर शिवसेना आमदारांच्या सुरक्षेच्या प्रश्नावर बरीच चर्चा झाल्यानंतर आता या आमदारांना थेट केंद्राकडून सुरक्षा पुरवण्यात आली आहे. शिंदे गटातील १५ आमदारांच्या घरी केंद्र सरकारकडून सुरक्षा पुरविण्यात येणार आहे.
Join Our WhatsApp Community