भारतातील Most Wanted आरोपी Zakir Naik साठी पाकिस्तानात रेड कार्पेट; भारताने चांगलेच सुनावले

झाकीर नाईक (Zakir Naik)  त्याच्या प्रक्षोभक भाषणांसाठी ओळखला जातो आणि सध्या तो 2016 च्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात भारत सरकारच्या राष्ट्रीय तपास संस्थेला हवा आहे.

187
सध्या भारताला अनेक गंभीर गुन्ह्याखाली हवा असलेला आरोपी मुस्लिम धर्मप्रचारक झाकीर नाईक (Zakir Naik) सध्या पाकिस्तानच्या दौऱ्यावर आहे. भारतातून फरार होवून दुबईत आश्रयाला असलेला झाकीर नाईक परदेशात राहून हिंदूंना मुस्लिम धर्मात धर्मांतरीत करण्यासाठी हिंदू देवदेवतांविरोधात व्हिडिओ बनवतो, ज्यामुळे भारतात त्या व्हिडिओच्या माध्यमातून मुल्ला – मौलवी हिंदू मुला-मुलींचे धर्मांतर करतात, तसेच दहशतवाद्यांना दहशतवादी कारवाया करण्यासाठी त्यांचे ब्रेनवॉश करतो. त्यामुळे भारतातील प्रमुख तपास संघटनांसाठी झाकीर नाईक हा Most Wanted आरोपी आहे. असा झाकीर नाईक सध्या भारताचे शेजारील राष्ट्र पाकिस्तानात येऊन भारत त्याचा कसा छळ करत आहे, अशा चोराच्या उलट्या बोंबा मारत आहे. झाकीर नाईकला पाकिस्तानात रेड कार्पेट अंथरणाऱ्या पाकिस्तानला भारताने यानिमित्ताने चांगलेच सुनावले.

काय म्हणाले भारत सरकार? 

भारतीय कायद्यातून पळून गेलेल्या व्यक्तीचे पाकिस्तानमध्ये उच्चस्तरीय स्वागत करण्यात आले आहे हे भारतासाठी “आश्चर्यजनक” नाही. 04 ऑक्टोबर (शुक्रवार) रोजी साप्ताहिक मीडिया ब्रीफिंगला संबोधित करताना परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल म्हणाले की, ते कोणत्या कागदपत्रांवर पाकिस्तानला गेले होते हे स्पष्ट झाले नाही. मलेशियाचे पंतप्रधान अन्वर इब्राहिम यांच्या नवी दिल्ली भेटीदरम्यान भारताने झाकीर नाईकचा (Zakir Naik) मुद्दा उपस्थित केला होता, याची आठवण त्यांनी करून दिली. झाकीर नाईक (Zakir Naik) एक भारतीय फरारी आहे. भारतीय कायदा आणि न्यायापासून पळून गेलेल्या व्यक्तीचे पाकिस्तानमध्ये उच्चस्तरीय स्वागत करण्यात आले आहे. ही निराशाजनक गोष्ट आहे, मला ते निंदनीय म्हणायचे आहे, परंतु त्याच वेळी मी म्हटल्याप्रमाणे, यात आश्चर्यकारक नाही. आता तो कोणत्या पासपोर्टसह तेथे गेला, हे मला स्पष्ट नाही. पासपोर्ट घेऊन तो तिथे गेला होता, आम्हाला काही स्पष्ट नाही, पण मला हेही आठवते की मलेशियाचे पंतप्रधान इथे आले होते तेव्हा या विषयावर चर्चा झाली होती.

विमानतळावर भव्य स्वागत

इस्लामाबाद, कराची आणि लाहोर येथील व्याख्यानमालेसाठी कडेकोट सुरक्षा व्यवस्था असताना पाकिस्तान सरकारच्या निमंत्रणावरून झाकीर नाईक (Zakir Naik) सोमवारी सकाळी पाकिस्तानात दाखल झाला. नवीन इस्लामाबाद विमानतळावर पोहोचल्यावर, पाकिस्तानच्या पंतप्रधान युवा कार्यक्रमाचे अध्यक्ष राणा मशहूद आणि धार्मिक व्यवहार मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव सय्यद अता-उर-रेहमान, एक्सप्रेस ट्रिब्यून यांच्यासह पाकिस्तान सरकारच्या प्रमुख नेत्यांनी त्यांचे स्वागत केले. नोंदवले होते. नाईक यांनी इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला असून त्यात त्यांचे विमानतळावर आगमन झाल्याचे दिसून आले आहे. विमानतळावर त्यांचे स्वागत करणाऱ्या मान्यवरांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले.

पाकिस्तानच्या पंतप्रधानांची भेट

झाकीर नाईकने गुरुवारी पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांची भेट घेतली. “इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानचे पंतप्रधान मियां मुहम्मद शेहबाज शरीफ यांच्याशी संभाषण करत असल्याचा झाकीर नाईकने त्याच्या सोशल मीडियावरील पोस्टवर म्हटले.

लाँड्रिंग प्रकरणात हवा आहे नाईक 

झाकीर नाईक (Zakir Naik)  त्याच्या प्रक्षोभक भाषणांसाठी ओळखला जातो आणि सध्या तो 2016 च्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात भारत सरकारच्या राष्ट्रीय तपास संस्थेला हवा आहे. आपल्या द्वेषपूर्ण भाषणाने लोकांना भडकवल्याचाही त्याच्यावर आरोप आहे. नाईक पीसटीव्ही नावाचे चॅनल चालवतो, ज्यावर भारत, बांगलादेश आणि श्रीलंकेत त्याच्या वादग्रस्त व्हिडीओमुळे बंदी घालण्यात आली आहे आणि त्याला कॅनडा आणि युनायटेड किंग्डममध्ये प्रवेश नाकारण्यात आला आहे.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.