रिफायनरी बारसूमध्येच होणार ; CM Devendra Fadnavis यांची ग्वाही

83
रिफायनरी बारसूमध्येच होणार ; CM Devendra Fadnavis यांची ग्वाही
रिफायनरी बारसूमध्येच होणार ; CM Devendra Fadnavis यांची ग्वाही

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलताना बारसू रिफायनरीवर (Barsu Refinery) भाष्य केलं आहे. रत्नागिरी जिल्ह्यात बारसू येथे हरित तेलशुद्धीकरण प्रकल्प (Green Oil Refining Project) (रिफायनरी) होणारच, अशी ग्वाही मुख्यमंत्री फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी दिली आहे. महाराष्ट्रात देशातील सर्वात मोठा असा एकच प्रकल्प उभारणे अवघड असून महाराष्ट्र, आंध्रप्रदेश आणि केरळ किंवा अन्य राज्यांत तीन प्रकल्प सुरू करण्याबाबत राज्य व केंद्र सरकारची ‘सौदी आराम्को’शी (Saudi Aramco) बोलणी सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. (CM Devendra Fadnavis)

हेही वाचा-राज्यात एचएसआरपी नंबरप्लेटचे दर इतर राज्यांच्या तुलनेत समान; मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांचे विधान

देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) म्हणाले, संबंधितांशी बोलणी सुरू आहे. देशात सुमारे १०० दशलक्ष डॉलर्सची गुंतवणूक करून तेलशुद्धीकरण प्रकल्प उभारण्याचा सौदी आराम्को कंपनीचा मानस आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील नाणार येथे प्रकल्पाला विरोध झाल्यानंतर बारसूमधील पर्यायी जागेचा विचार झाला. दीड वर्षापूर्वी तांत्रिक चाचण्यांचे काम झाले असून अहवालावर वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरू आहे. (CM Devendra Fadnavis)

हेही वाचा-Women Safety: युवतींनो ‘स्मार्ट’ व्हा! भय इथले संपत नाही

लोकसभा व विधानसभा निवडणूक काळ आणि आचारसंहितेमुळे महाराष्ट्रात शासकीय पातळीवर फारशा हालचाली झाल्या नाहीत. त्यामुळे कंपनीने सागरी किनारपट्टी असलेल्या गुजरात व आंध्र प्रदेश राज्य सरकारशी चर्चा सुरू केली होती. किमान २० दशलक्ष टन क्षमता असलेला प्रकल्प उभारण्यासंदर्भात राज्य सरकारची कंपनीशी चर्चा सुरू असल्याचे सांगितले. (CM Devendra Fadnavis)

हेही वाचा-Pop Idol : कलेसोबतच पर्यावरण रक्षण आणि सणाचे पावित्र्यही महत्त्वाचे

राज्याचा विकास आणि अर्थकारणाला मोठा हातभार लावणारा हा प्रकल्प लवकरात लवकर मार्गी लागावा, असे आपल्या सरकारचे प्रयत्न असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. बारसू येथील मृदापरीक्षण तपासणी अहवाल सकारात्मक असून राज्यात प्रकल्प उभारणीसाठी कोणत्याही अडचणी नाहीत. प्रकल्पासाठी आवश्यक बाबींची पूर्तता करण्याचे आणि केंद्रासह कंपनीच्या उच्चपदस्थांशी चर्चा करण्याचे काम सध्या सुरू आहे. असं फडणवीस म्हणाले आहेत. (CM Devendra Fadnavis)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.