सध्या लोकसभा निवडणुकीचे वेध लागले आहेत, त्यानंतर राज्यात विधानसभा, नंतर महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुका होतील. त्यामुळे निवडणूक आयोगाकडे (Election Commission) नवीन राजकीय पक्षांची नोंद होऊ लागली आहे. वर्षभरात ४५ नवीन राजकीय पक्षांची नोंद झाली आहे. डिसेंबर २०२२ मध्ये राज्यात ३५१ राजकीय पक्ष होते. डिसेंबर २०२३ पर्यंत त्यांची संख्या ३७६ इतकी झाली. आता ती संख्या ३९६ वर पोहचली आहे.
राज्य निवडणूक आयोग (Election Commission) स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे नियमन करतो. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये राजकीय पक्षांना उमेदवार उभे करताना राज्य निवडणूक आयोगाकडे नोंदणी करणे आवश्यक आहे. विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांमध्ये भाग घेण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे (Election Commission) पक्षाची नोंदणी करावी लागते. प्रभाग निर्मिती व त्याची संख्या यासंदर्भातील विविध याचिकांची सुनावणी सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. त्यामुळे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका गेल्या दीड वर्षांपासून रखडल्या आहेत. यासंदर्भातील पुढील सुनावणी एप्रिलमध्ये होणार आहे. त्यानंतर या निवडणूक जाहीर होण्याची शक्यता आहे.
(हेही वाचा Congress : मंदिरांवर ‘झिजिया कर’ लावणारे विधेयक कर्नाटक विधान परिषदेत नामंजूर; काँग्रेस सरकारला धक्का)
कपिल पाटील यांचा नवा पक्ष
जनता दलाचे (संयुक्त )विधान परिषदेचे शिक्षक गटातील आमदार कपिल पाटील हे ३ मार्च रोजी नव्या पक्षाची घोषणा करणार आहेत. बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी भाजपबरोबर आघाडी केल्याने पाटील यांनी स्वतंत्र पक्ष स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. ते समाजवादी जनता दल नावाने नव्या पक्षाची स्थापना करणार आहेत.
Join Our WhatsApp Community