शिवसेना खासदार रवींद्र वायकर (Ravindra Waikar) यांना मोठा दिलासा मिळाला आहे. वायकर यांच्याविरोधातील जोगेश्वरी भूखंड घोटाळा (Jogeshwari Plot Scam) प्रकरणाची फाईल अखेर बंद करण्यात आली आहे. मुंबई महापालिकेने वायकर यांच्याविरोधात गैरसमजातून गुन्हा दाखल केल्याचे नमूद केले आहे. रवींद्र वायकर (Ravindra Waikar) यांच्या विरोधात भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आरोप केला होता.
(हेही वाचा-“मनसेच्या जाहीरनाम्यात बहिणींसाठी योजना नाही, अशा घोषणांना…”, काय म्हणाले Raj Thackeray ?)
मुंबईतील जोगेश्वरी येथील सुप्रिमो क्लबचा गैरवापर करून तिथे हॉटेल्स बांधताना माहिती लपवल्याचा आणि बनावट माहितीच्या आधारे महापालिकेकडून विविध परवानग्या घेण्यात आल्याप्रकरणी शिवसेना शिंदे गटाचे खासदार रवींद्र वायकर (Ravindra Waikar) आणि त्यांच्या पत्नीविरोधात दाखल प्रकरण बंद करण्यात आले आहे.
(हेही वाचा-Devendra Fadanvis यांचा मविआवर हल्लाबोल; मतांसाठी नेते उलेमाचे तळवे चाटत आहेत)
आर्थिक गुन्हे शाखेने हे प्रकरण बंद करण्याची मागणी करणारा अहवाल न्यायालयात दाखल केला होता. मुंबई पोलिसांनी दाखल केलेला अहवाल महानगर दंडादाधिकारी न्यायालयाने मान्य केला आहे. मुंबई महापालिकेने वायकर यांच्याविरोधात गैरसमजातून गुन्हा दाखल केल्याचे नमूद केले आहे. त्यामुळे वायकर (Ravindra Waikar) यांना दिलासा मिळाला आहे.
(हेही वाचा-वृत्त वाहिन्यांवरील बातम्यांसाठी Election Commission कडून इलेक्ट्रॉनिक मीडिया मॉनिटरिंग सेंटर दक्ष)
रवींद्र वायकर (Ravindra Waikar) यांच्या विरोधात भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी आरोप केला होता. जोगेश्वरी येथील हॉटेल संदर्भात ही तक्रार होती. मुंबई महापालिकेच्या राखीव भूखंडावर वायकर यांनी पंचतारांकित हॉटेल बांधले आहे. त्याची परवानगी वायकर यांनी पालिकेकडून घेतली नव्हती. हा सुमारे 500 कोटी रुपयांचा घोटाळा असल्याचा दावा सोमय्या यांनी त्यांच्या तक्रारीत केला होता. आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाकडे ही तक्रार करण्यात आली होती. त्याची गंभीर दखल घेऊन आर्थिक गुन्हे शाखेनं वायकर (Ravindra Waikar) यांना चौकशीसाठी बोलावलं होतं. वायकर चौकशीला उपस्थित राहिले होते. त्यानंतर वायकरांना ईडीकडून समन्स बजावण्यात आले होते. आता हे प्रकरण बंद करण्यात आले आहे.
हेही पहा-
Join Our WhatsApp Community