Murshidabad मध्ये मुसलमानांचा धार्मिक हिंसाचार, २ ठार; पोलिसांनी किती जणांच्या आवळल्या मुसक्या; वाचा…

शुक्रवारचा जुम्म्याचा नमाज पाडल्यानंतर मुसलमान रस्त्यावर उतरले.

50

वक्फ सुधारित विधेयक संमत झाल्यापासून मुसलमान चांगलेच चवताळले आहेत. पश्चिम बंगालमध्ये तर मुसलमानांना ममता सरकारकडूनच हिंसाचार करण्यासाठी राजाश्रय मिळत आहे. येथील मुर्शिदाबाद (Murshidabad)  जिल्ह्यातील समसेरगंज येथे वक्फ कायद्याप्रकरणी मुसलमानांनी केलेल्या हिंसाचारात दोन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे, मात्र पोलीस अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांकडे विशेष लक्ष न देता कारवाई केल्यामुळे ११२ धर्मांध मुसलमानांच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत.

(हेही वाचा ज्येष्ठ वकील विष्णू शंकर जैन Waqf Act 1995 ला देणार आव्हान; मागील ७० वर्षांत वक्फ बोर्डाने हडपलेल्या जमिनीही उघडकीस येणार?)

शुक्रवारचा जुम्म्याचा नमाज पाडल्यानंतर मुसलमान रस्त्यावर उतरले, आम्ही या कायद्याला पाठिंबा देत नाही. हा कायदा आमच्या राज्यात लागू केला जाणार नाही, असे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी म्हणाल्या. तरीही वक्फ कायद्याच्या विरोधात शुक्रवारी पश्चिम बंगालच्या काही भागात निदर्शने झाली, Murshidabad आंदोलकांनी वाहने जाळली, वाहने आणि रेल्वे वाहतूक विस्कळीत केली. जमावाला नियंत्रित करण्याचा प्रयत्न करताना काही पोलिस जखमी झाले. मुर्शिदाबाद Murshidabad  जिल्ह्यातील सुती येथे निदर्शकांनी निषेधाच्या आदेशांना न जुमानता एकत्र येऊन रस्ते अडवले, सुरक्षा कर्मचाऱ्यांवर दगडफेक केली, धर्मांध मुसलमानांनी पोलिस व्हॅनवर दगडफेक केल्यानंतर निदर्शने हिंसक झाली, ज्यामुळे संघर्ष झाला ज्यामध्ये सुमारे १० पोलिस जखमी झाले. सामान्य परिस्थिती पूर्ववत करण्यासाठी बीएसएफला हस्तक्षेप करण्याची विनंती केल्यामुळे हिंसाचाराच्या दरम्यान काही पोलिस कर्मचाऱ्यांना जवळच्या मशिदीत आश्रय घ्यावा लागला, असे दुसऱ्या एका अधिकाऱ्याने सांगितले.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.