अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते यांचा पोलीस कोठडीतील मुक्काम वाढणार?

179

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या घरावर एसटी कर्मचाऱ्यांनी केलेल्या हल्ल्यानंतर अटक केलेले वकील गुणरत्न सदावर्ते यांची पोलीस कोठडी सोमवारी संपणार आहे. त्यामुळे आज पोलीस त्यांची कोठडी वाढवून मागणार असल्याचे सांगितले जात आहे. सदावर्ते यांना आज मुंबईत गिरगावमधील न्यायालयात हजर केले जाणार आहे. तिथे सदावर्ते यांना जामीन की पुन्हा कोठडी याचा निर्णय होणार आहे.

हल्ल्याप्रकरणी आणखी काही लोकांना ताब्यात

माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, शरद पवारांच्या घरावरील हल्ल्याप्रकरणी आणखी काही लोकांना ताब्यात घेतले आहेत. पोलीस काही पत्रकारांचा जबाब नोंदवण्याचीही शक्यता आहे. अॅड. गुणरत्न सदावर्ते यांना गिरगाव न्यायालयात हजर केले जाणार आहे. त्यामुळे गिरगाव न्यायालयाबाहेर पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. मुंबई पोलिसांनी या प्रकरणी आणखी काही आंदोलकांना ताब्यात घेतल्याची माहिती आहे. त्यांनाही न्यायालयात हजर करण्यात येण्याची शक्यता आहे. याप्रकरणी पोलिसांनी रविवारी सदावर्ते यांच्या मुंबईतील निवासस्थानी जाऊन तपास केला. परेल इथल्या क्रिस्टल टॉवरमध्ये जाऊन पोलिसांच्या टीमने सीसीटीव्ही तपासून आंदोलनाआधी सदावर्ते यांची कुणी भेट घेतली होती का याचीही चौकशी केली.

(हेही वाचा – गुजरातमध्ये ऑरगॅनिक कंपनीत भीषण स्फोट, 6 जणांचा होरपळून मृत्यू)

काय आहे प्रकरण?

संपकरी एसटी कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी राष्ट्रवादीचे खासदार शरद पवार यांच्या मुंबईतील निवासस्थानी सिल्व्हर ओकवर दगडफेक आणि चप्पलफेक करत गोंधळ घातला होता, असे वृत्त समोर आले होते. मात्र आझाद मैदानात आंदोलनात सहभागी असणाऱ्या संपकऱ्यांना यासंदर्भात कल्पना नसल्याचे देखील संपकऱ्यांनी सांगितले. एसटी कर्मचाऱ्यांना चिथावणी देण्याच्या आरोपाखाली अ‍ॅड.गुणरत्न सदावर्ते यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. तर इतर 109 आंदोलकांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. मात्र सोमवारी सदावर्ते यांची पोलीस कोठडी संपणार असून, पोलीस सखोल चौकशीसाठी कोठडीत वाढ करावी, अशी मागणी करणार आहेत

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.