नाशिकच्या (Nashik) काठे गल्लीत परिसरातील अनधिकृत दर्गा काढण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. नाशिक पोलिसांनी 15 दिवसांपूर्वी सातपीर दर्ग्याचे बांधकाम हटवण्याची नोटीस दिली होती. मात्र, कालपर्यंत दर्ग्याचे बांधकाम हटवण्यात आले नाही. त्यामुळे पोलिसांनी आणि महानगरपालिकेने कारवाई केली. मुस्लिम धर्मगुरू आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थिती संयुक्तपणे मध्यरात्रीच्या सुमारास कारवाईला सुरूवात झाली. (Nashik)
SHARIAT FIRST? Officials razing an illegal Dargah in Nashik attacked. Municipality issued notice to remove unauthorized construction in 15 days, dargah committee did nothing. In 2024 more than 1000 Hindu religious encroachments were demolished across Maharashtra. No riots. pic.twitter.com/v7upHKUWUi
— Rahul Shivshankar (@RShivshankar) April 16, 2025
प्रशासनाच्या कारवाईबाबतीत चर्चा सुरू झाल्यानंतर संतप्त जमाव काठे गल्लीच्या दिशेने चालत आला. जमावाने पोलीस कर्मचारी, अधिकारी आणि पोलीस वाहनांच्या दिशेने दगडफेक सुरू केली. यात चार अधिकारी आणि सुमारे 11 पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. यानंतर जमावाला पंगविण्यासाठी अश्रुधुराचा वापर करण्यात आला. काही जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. (Nashik)
हेही वाचा-रुग्णालयातून बाळ चोरीस गेल्यास परवाना रद्द होणार ; Supreme Court चे राज्य सरकारला निर्देश
अतिरिक्त पोलिस अधिकारी, एसपीआरएफ च्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. मध्यरात्री पोलिसांनी बाळाचा वापर केल्यानंतर कोणताही अनुचित प्रकार घडलेला नाही. अतिक्रमण जवळपास जमीनदोस्त करण्यात आले असून बांधकामाचा राडारोडा हटविण्याचे काम सुरु आहे. काठे गल्ली परिसरात अनधिकृत दर्गा हटविण्याची गेल्या अनेक वर्षाची मागणी होती. गेल्या महिन्यात हिंदुत्ववादी संघटनांच्यावतीने आंदोलन ही करण्यात आले होते. (Nashik)
हेही वाचा- मुंबईत पावसाळ्यापूर्वी रस्ते खड्डेमुक्त करा; DCM Eknath Shinde यांचे निर्देश
वक्फ बोर्ड आणि उच्च न्यायालयात यासंदर्भात सुनवणी झाली. उच्च न्यायालयात दर्गा ट्रस्टला दर्गा बाबतीत काही पुरावे सादर करता आले नसल्याने मनपाने दर्गा अनधिकृत ठरवून 15 दिवसाच्या आता अनधिकृत दर्गा काढण्याची नोटीस बजावण्यात आली होती. त्यानंतर मध्यरात्रीपासूनच कारवाई सुरू करण्यात आली आहे. सध्या परिसरात शांतता असून या मार्गावरील वाहतूक पुढील तीन दिवस बंद ठेवण्यात आली असून बंदोबस्त कायम राहणार आहे. (Nashik)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community