मुंबईतील मशिदींवर लावण्यात भोंग्यांमुळे ध्वनी प्रदूषण होत आहे, त्यामुळे हे भोंगे हटवण्यात यावेत, अशी मागणी भाजपचे नेते मोहित कंबोज यांनी थेट मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे यांच्याकडे केली आहे.
शहरातील वाहतूक कोंडी, ध्वनी प्रदूषण आदी प्रश्न सोडवण्यासाठी पोलीस आयुक्ती संजय पांडे हे चांगले उपक्रम राबवत आहेत. ध्वनी प्रदूषणाच्या मुद्द्याला अनुसरूनच भाजप नेते मोहित कंबोज यांनीही एक मागणी केली आहे. मुंबईतील मशिदींवर लावण्यात आलेले अनधिकृत भोंगे हटवले पाहिजेत, असे कंबोज म्हणाले. या मागणीसंदर्भात एक व्हिडिओ ट्विट करून, ध्वनी प्रदूषणाविरोधात मुंबई पोलीस आयुक्तांनी नवीन मोहीम हाती घ्यायला हवी, अशी विनंती केली.
(हेही वाचा एसटी कामागारांकडे उरले फक्त २ दिवस…)
मुंबई ध्वनी प्रदूषणमुक्त केली पाहिजे
मुंबई शहरात मशिदींवर लावण्यात आलेले भोंगे हटवले पाहिजेत, अशी मागणी मोहित कंबोज यांनी केली होती. या मागणीचा पुनरुच्चार कंबोज यांनी केला आहे. यासंदर्भात एक व्हिडिओ त्यांनी ट्विट केला आहे. मशिदींवरील बेकायदा भोंगे हटवले पाहिजेत. मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे हे ध्वनी प्रदूषणाविरोधात चांगले उपक्रम राबवत आहेत. मुंबईत मशिदींवर बेकायदा भोंगे लावले आहेत, ज्यांच्यामुळे ध्वनी प्रदूषण होते. त्याचा परिणाम अभ्यास करणारे विद्यार्थी, वयोवृद्ध मंडळींसह अनेकांवर होतो, म्हणून ते भोंगे हटवले पाहिजेत. पोलीस आयुक्तांनी त्यावर कारवाई केली पाहिजे. मुंबई ध्वनी प्रदूषणमुक्त केली पाहिजे. आम्ही कोणत्याही समाज आणि धर्माविरोधात नाही, असे कंबोज म्हणाले.
Join Our WhatsApp Community