अखेर भाजपचं आंदोलन यशस्वी ठरलं; मालाडमधील उद्यानाला दिलेलं टिपू सुलतान नाव बदललं

176

मालाडमधील मालवणीतील एका क्रीडा मैदानाचं ‘वीर टिपू सुलतान क्रीडासंकुल’ असं नामकरण करण्यात आलं होत. यामध्ये काँग्रेसचे नेते अस्लम शेख यांनी पुढाकार घेतला होता आणि त्यानंतर भाजपनं जोरदार आंदोलन केलं होत. याच भाजपच्या आंदोलनाला आता यश आलं आहे. मालाडमधील उद्यानाचं वादग्रस्त नाव हटवण्यात आलं आहे. पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी मालाडमधील उद्यानाला दिलेलं टिपू सुलतानचं नाव बदलल्याची माहिती ट्वीटरद्वारे दिली आहे.

मंगलप्रभात लोढा ट्वीट करत म्हणाले की, ‘अखेर आंदोलन यशस्वी.. गेल्यावर्षी मविआ सरकार विरोधात सकल हिंदू समाजाने केलेलं आंदोलन आणि जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत खासदार गोपाळ शेट्टी यांची मागणी लक्षात घेऊन, मविआ सरकारच्या काळात मालाड मधील उद्यानाला दिलेले टिपू सुलतानचं नाव, जिल्हाधिकारी कार्यालयास आदेश देऊन आम्ही हटवलं!’

गतवर्षी देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्तानं २६ जानेवारी रोजी १८व्या शतकातील वादग्रस्त म्हैसूर शासक टिपू सुलतानच्या नावावर मुंबईतील क्रीडा संकुलाचं उद्घाटन काँग्रेस नेते आणि मुंबईचे तत्कालीन पालकमंत्री अस्लम शेख यांच्या हस्ते झालं होत. या मैदानाला टिपू सुलतानाचं नाव दिल्यानं राजकीय वादाला तोंड फुटलं. याला विश्व हिंदू परिषद आणि भाजपनं विरोध केला. एखाद्या प्रकल्पाचं नाव “क्रूर हिंदूविरोधी” देणं निंदनीय बाब आहे, असं भाजपचं म्हणणं होत.

(हेही वाचा – जपून शब्द वापरण्याचा सल्ला ठाकरेंनी दिला असता तर मानला असता; आंबेडकरांचं राऊतांना प्रत्युत्तर)

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.