खासदारकी रद्द केल्यानंतर आता लोकसभा वेबसाईटवरून राहुल गांधींचे नाव हटवले

140

काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केल्यानंतर लोकसभेच्या वेबसाईटवरूनही त्यांचे नाव हटवण्यात आले आहे. शुक्रवारी, लोकसभा सचिवालयाने राहुल गांधी यांच्या सदस्यत्व रद्द करण्याची अधिसूचना जारी केली होती.

दरम्यान लोकसभेच्या वेबसाईटवर सध्याच्या सर्व खासदारांची यादी आहे. यामध्ये आता राहुल गांधींचे नाव नाहीये.  केरळमधील वायनाड ज्या जागेवरून राहुल गांधी लोकसभेवर निवडून आले होते, त्यांची माहितीही काढून टाकण्यात आली आहे. संसदेचे सदस्यत्व रद्द केल्यानंतर लोकसभेच्या वेबसाइटवरून सदस्याची माहिती काढून टाकली जाते. त्यामुळे राहुल गांधी यांचे सदस्यत्व रद्द झाल्यानंतर तात्काळ लोकसभा वेबसाईटवरून राहुल यांचे नाव काढून टाकण्यात आले आहे.

२०१९ साली लोकसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी काँग्रेस नेते राहुल गांधींनी कर्नाटक दौऱ्यातील एका सभेत पंतप्रधान मोदींच्या नावाचा उल्लेख करत ललित मोदी, नीरव मोदी यांची नावे घेतली होती आणि सर्व चोरांची आडनाव मोदी कशी काय असतात?, असा सवाल केला होता. याप्रकरणी सुरतच्या भाजप आमदार पूर्णेश मोदी यांनी राहुल गांधींविरोधात मानहानीचा खटला दाखल केला. त्याच संदर्भात गुरुवारी, गुजरातमधील सुरत जिल्हा आणि सत्र न्यायालयाने राहुल गांधींना २ वर्षांनी शिक्षा सुनावली होती. मात्र, याप्रकरणात राहुल गांधींना तात्काळ जामीन मंजूर झाला होता. पण आता लोकसभा सचिवालयाने मोठी कारवाई करत राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केली. त्यामुळे काँग्रेससाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

(हेही वाचा – राहुल गांधींची खासदारकी घालवणारे गुजरातचे भाजप आमदार कोण?)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.