‘अकबर रोड’ सीडीएस बिपीन रावत यांच्या नावाने ओळखला जाणार?

146

दिल्लीतल्या अकबर रोडला दिवंगत सीडीएस जनरल बिपीन रावत यांचं नाव देण्याची मागणी दिल्लीतल्या भाजपाच्या मीडिया विभागाच्या प्रमुखांनी केली आहे. याबद्दल त्यांनी नवी दिल्ली नगरपरिषदेला पत्रही लिहिलं आहे. अकबर हा आपल्यावर आक्रमण केलेला राजा होता, त्याच्याऐवजी या रस्त्याला जनरल रावत यांचं नाव देणं अधिक योग्य आहे, असं या पत्रात नमूद करण्यात आलं आहे.

काय लिहिलंय पत्रात

नवी दिल्ली नगरपरिषदेला लिहिलेल्या पत्रात नवीन कुमार जिंदाल म्हणाले, “आपल्याला विनंती आहे की, अकबर रोडचे नामकरण जनरल बिपीन रावत यांच्या नावावर करून देशाच्या पहिल्या सीडीएसच्या आठवणी दिल्लीत कायमस्वरूपी जागृत ठेवाव्या. परिषदेकडून जनरल रावत यांना हीच खरी श्रद्धांजली असेल, असा माझा विश्वास आहे. असं जिंदाल यांनी आपल्या पत्रात म्हटलं आहे. दिल्ली नगरपरिषदेचे उपाध्यक्ष सतीश उपाध्याय म्हणाले की, मी या मागणीच्या बाजूने आहे. पण हे काम दिल्ली नगरपरिषदेने विचारपूर्वक केले पाहिजे. मी सोशल मीडियावर अशी पत्रे पाहिली ज्यात इतर लोकांनीही अशाच प्रकारची विनंती केली आहे, असे उपाध्याय म्हणाले.

या आधीही झाली होती मागणी 

अकबर रोड या रस्त्याचे नाव बदलण्याची ही पहिलीच मागणी नाही. मंत्री व्ही.के.सिंह यांनी यापूर्वी अकबर रोडचे नाव बदलून महाराणा प्रताप रोड करण्याची मागणी करणारे पत्र लिहिले होते. या रस्त्याचे अनेकदा विद्रुपीकरणही झाले आहे. ऑक्टोबरमध्ये अकबर रोडच्या एका फलकाची तोडफोड करण्यात आली होती आणि त्यावर ‘सम्राट हेमू विक्रमादित्य मार्ग’ असे पोस्टर्स लावण्यात आले होते. हिंदू सेनेने या कृत्यामागे आपला हात असल्याचा दावा केला होता.

 (हेही वाचा :विधान परिषदेच्या दोन जागांसाठी आज मतमोजणी )

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.