अवघ्या काही दिवसांवर प्रजासत्ताक दिन येऊन ठेपला आहे. या दिनानिमित्त केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. वृत्तसंस्था एएनआयने सरकारी सूत्रांच्या हवाल्याने म्हटलं आहे की, देशात प्रजासत्ताक दिनाचा उत्सव आता 24 जानेवारी ऐवजी 23 जानेवारीपासूनच सुरू होणार आहे. प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यात सुभाषचंद्र बोस यांची जयंती समाविष्ट करण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार, मोदी सरकारचा हा निर्णय भारताच्या इतिहास आणि संस्कृतीशी संबंधित मोठ्या व्यक्तींच्या स्मरणार्थ घेण्यात आला आहे.
Republic Day Celebrations will now begin every year from 23rd January instead of 24th January to include the birth anniversary of Subash Chandra Bose: GoI Sources
— ANI (@ANI) January 15, 2022
मोदी सरकारने प्रजासत्ताक दिनाबाबत घेतलेला हा मोठा निर्णय आहे. हा निर्णय भारताच्या संस्कृतीशी आणि इतिहासाशी संबंधित असणाऱ्या मोठ्या व्यक्तिमत्त्वाच्या स्मरणार्थ घेण्यात आला आहे. स्वातंत्र्यसैनिक सुभाषचंद्र बोस या थोरपुरुषाची जयंती 23 जानेवारीला असते. याचा विचार लक्षात घेऊन, केंद्र सककारने दरवर्षी 24 जानेवारीपासून साजरा होणार प्रजासत्ताक दिन हा 23 जानेवारीपासूनच साजरा करण्यात येणार आहे.
(हेही वाचा -’16 जानेवारी’ हा दिवस आता ‘नेशनल स्टार्ट-अप डे’)
इतकेच नाही तर केंद्राने नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याशी संबंधित देशभरातील स्थळांना प्रोत्साहन देण्यासाठी योजना आखल्या आहेत. 21 ऑक्टोबर 1943 रोजी बोस यांनी जाहीर केलेल्या आझाद हिंद सरकारच्या स्थापनेच्या वर्षपूर्तीच्या स्मरणार्थ पर्यटन मंत्रालय क्युरेटेड टूरचे आयोजन करत आहे. त्यानुसार, सुभाषचंद्र बोस यांच्या स्मृती स्थळांची यादी तयार करण्यात आली आहे. यामध्ये वेगवेगळ्या रस्त्यांचा समावेश असणार आहे. तर नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याशी जोडलेल्या स्मृती स्थळांचा समावेशही असणार आहे.
यापूर्वीही अनेक तारखांना राष्ट्रीय महत्त्वाचे दिवस घोषित केले
- 14 ऑगस्ट – फाळणी स्मृती दिन
- 31 ऑक्टोबर सरदार पटेल जयंती – राष्ट्र्रीय एकता दिवस
- 15 नोव्हेंबर – आदिवासी गौरव दिन
- 26 नोव्हेंबर – संविधान दिन