- प्रतिनिधी
शिवसेनेच्या नाराजीमुळे नाशिक आणि रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाला स्थगिती देण्याची नामुष्की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर ओढवली असली तरीही प्रजासत्ताक दिनी या दोन्ही जिल्ह्यात अनुक्रमे गिरीश महाजन, आदिती तटकरे हेच राष्ट्रध्वजावतरण करणार असल्याचे सोमवारी स्पष्ट झाले आहे. त्यामुळे पालकमंत्री नसतानाही या दोघांना २६ जानेवारीला ध्वजावतरणाचा सन्मान मिळाला आहे. (Republic Day)
(हेही वाचा – १९ वर्षीय मुलीवर ३० Bangladesh च्या टोळीकडून लैंगिक अत्याचार)
दावोसला रवाना होण्यापूर्वी मुख्यमंत्री फडणवीस यांनी जिल्हा पालकमंत्रिपदाची यादी जाहीर केली. रायगड जिल्ह्यात शिवसेना आणि भाजपा आमदारांचा विरोध असतानाही रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदी महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांची वर्णी लागली. या नियुक्तीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संताप व्यक्त केल्यानंतर फडणवीस यांनी रायगडसह नाशिक जिल्हा पालकमंत्रिपदाला स्थगिती दिली. नाशिकचे पालकमंत्रिपद राष्ट्रवादी काँग्रेसला हवे आहे. या स्थगितीमुळे प्रजासत्ताक दिनी जिल्हाधिकारी कार्यालयात राष्ट्रध्वजावतरण कोण करणार? असा प्रश्न निर्माण झाला होता. (Republic Day)
(हेही वाचा – पालकमंत्री पदावरून कोणतेही वाद नाहीत; महसूल मंत्री Chandrashekhar Bawankule यांची स्पष्टोक्ती)
या पार्श्वभूमीवर सामान्य प्रशासन विभागाच्या राजशिष्टाचार विभागाने सोमवारी शासन परिपत्रक काढून नाशिक आणि रायगड जिल्ह्यात अनुक्रमे गिरीश महाजन, आदिती तटकरे यांच्या हस्ते राष्ट्रध्वजावतरण होईल, असा खुलासा केला आहे. त्यामुळे नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्रिपदावर दावा करणाऱ्या कृषिमंत्री माणिकराव कोकाटे तसेच भरत गोगावले यांना नवा आदेश येईपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे. (Republic Day)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community