(हेही वाचा- IPL 2024 CSK vs GT : चेन्नईच्या हंगामात पहिल्यांदा २०० धावा, गुजरातचा केला ६३ धावांनी पराभव)
लोकसभा निवडणुकीची (Lok Sabha Elections 2024) रणधुमाळी सुरु झाली असून राज्यात महायुतीचा (Mahayuti) घटक पक्ष असताना ही रिपब्लिकन पक्षाकडे (Republic Party) जागावाटपात महायुतीकडुन (Mahayuti) दुर्लक्ष झालेले आहे. त्यात भर म्हणून रिपब्लिकन पक्षाने (Republic Party) केलेल्या विरोधाला न जुमानता भाजपाने मनसेला सोबत घेण्याचा आटापिटा केला आहे. राज्यभरात अनेक जिल्हात रिपब्लिकन कार्यकर्त्यांनी आपल्या तीव्र भावना समाज माध्यमांवर व्यक्त केल्या आहेत.रिपब्लिकन कार्यकर्त्यांची भावनिकता ओळखून रामदास आठवले (Ramdas Aathavle) यांनी तातडीने गुरुवार, 28 मार्च रोजी रिपब्लिकन पक्षाच्या (Republic Party) राज्यस्तरीय बैठकीचे आयोजन केले आहे. या बैठकीत लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Elections 2024) महायुतीच्या (Mahayuti) जागा वाटपात रिपब्लिकन पक्षाचा वाटा किती, तसेच महायुतीत मनसेला वाटा दिल्यास रिपब्लिकन पक्षाने (Republic Party) कोणती वाट धरायची आणि कोणाची वाट लावायची यावर रिपाइंच्या राज्यस्तरीय बैठकीत विचार विनिमय होणार आहे. लोकसभा निवडणुकीत राज्यात रिपाइं काय भूमिका घेणार याची उत्सुकता आहे. त्यामुळे रिपाइंच्या राज्यस्तरीय बैठकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. (Republic Party)