१ डिसेंबरपासून तुमच्याकडे Digital Currency येणार! कसा करता येणार वापर?

108

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया उद्या म्हणजेच १ डिसेंबर रोजी किरकोळ ग्राहकांसाठी आपला डिजिटल रूपया लाँच करणार आहे. डिजिटल रूपया आल्यानंतर तुम्हाला खिशात रोख पैसे ठेवण्याची आवश्यकता नाही. हे रूपये सध्याच्या नोटांप्रमाणे वापरली जाऊ शकतात. याच पहिला पायलट प्रोजेक्ट होणार आहे. या पायलट प्रोजेक्ट अंतर्गत रूपयाचे निर्माण, डिस्ट्रिब्युशन, रिटेल वापर याच्या संपूर्ण प्रक्रियेचे टेस्टिंग केले जाणार आहे. यापूर्वी केंद्रीय बँकेने १ नोव्हेंबर रोजी होलसेल ट्रँझॅक्शनसाठी डिजिटल रूपया लाँच केला होता. या होलसेल ट्रँझॅक्शननंतर आता रिटेल ट्रँझॅक्शनसाठी रिझर्व्ह बँकेचा डिजिटल रूपया उद्यापासून देशातील काही निवडक ठिकाणी लाँच करण्यात येणार आहे.

(हेही वाचा – पुणेकरांना दिलासा! पुणे स्टेशन बस सेवा पुन्हा सुरू, ‘या’ 8 मार्गांवर PMPML धावणार)

चलनात येणार डिजिटल करन्सी

उद्यापासून म्हणजेच १ डिसेंबर २०२२ रोजी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया किरकोळ ग्राहकांसाठी डिजिटल रुपया लाँच करणार आहे. रिझर्व्ह बँकेने या डिजिटल करन्सीला सेंट्रल बँक डिजिटल करन्सी (CBDC) नाव दिले आहे. ब्लॉकचेन तंत्रज्ञानावर आधारित हे चलन आहे. जेथे वित्तीय संस्था होलसेल चलन वापरतात, तर रिटेल चलनाचा वापर सामान्य लोक करू शकतात. १ डिसेंबरपासून ठराविक ठिकाणी हा रूपया चलनात आणला जाणार आहे. यामध्ये ग्राहकापासून ते मर्चंटपर्यंत सर्वांचा समावेश असणार आहे.

असा करता येणार वापर

डिजिटल करन्सीचे वितरण बँकांच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. डिजिटल वॉलेटद्वारा तुम्ही दुसऱ्या व्यक्तीला किंवा विक्रेत्याला डिजिटल करन्सी देऊ शकणार आहेत. तुमच्या फोनमध्ये ज्या बँकेचे अ‍ॅप असेल त्या बँकेच्या डिजिटल वॉलेटमधून तुम्ही व्यावहारासाठी हा रुपया वापरू शकणार आहात. यासाठी तुम्ही क्यूआर (QR) कोड्स स्कॅन करून व्यवहार करू शकता.

या शहरांतून होणार सुरूवात

समोर आलेल्या अहवालानुसार, RBI उद्यापासून मुंबई, नवी दिल्ली, बेंगळुरू आणि भुवनेश्वर येथे डिजिटल रुपी एक पायलट प्रोजेक्ट म्हणून लाँच करण्याच्या तयारीत आहे. त्यामध्ये SBI, ICICI बँक, येस बँक आणि IDFC फर्स्ट बँक यांचा समावेश असणार आहे. त्यानंतर हळूहळू देशातील इतर शहरांमध्ये डिजिटल रुपीचा विस्तार केला जाणार असल्याचे सांगितले जात आहे.

कोणत्या बँका असतील सहभागी

पायलट प्रोजेक्टमध्ये ८ बँकांचा समावेश असणार आहे. पण पहिल्या टप्प्यातील सुरूवात देशातील चार शहरात SBI, ICICI, yes बँक, IDFC फर्स्ट बँकेच्या माध्यमातून होणार आहे. यानंतर बँक ऑफ बडोदा, युनिअन बँक ऑफ इंडिया, HDFC बँक, कोटक महिंद्रा बँक या पायलट प्रोजेक्टमध्ये सहभागी असणार आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.