Maratha reservation : राजीनामा सत्र सुरूच, मराठा आरक्षणासाठी खासदार-आमदारांचे राजीनामे

मराठा आरक्षणासाठी बीड जिल्ह्यातील भारतीय जनता पक्षाच्या आमदाराने राजीनामा दिल्याची माहिती सध्या समोर आली आहे.

199
Maratha reservation : राजीनामा सत्र सुरूच, मराठा आरक्षणासाठी खासदार-आमदारांचे राजीनामे
Maratha reservation : राजीनामा सत्र सुरूच, मराठा आरक्षणासाठी खासदार-आमदारांचे राजीनामे

महाराष्ट्रात सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापला आहे. आरक्षणासाठी राज्यात ठिकठिकाणी आंदोलने सुरु आहेत. अशातच आरक्षणासाठी आमदार आणि खासदारांच्या राजीनाम्याचे सत्र सध्या सुरु झाले आहे. (Maratha reservation)

मराठा आरक्षणासाठी बीड जिल्ह्यातील भारतीय जनता पक्षाच्या आमदाराने राजीनामा दिल्याची माहिती सध्या समोर आली आहे. गेवराईचे आमदार लक्ष्मण पवार यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला आहे. सोबतच आमदार सुरेश वरपुडकर यांनी देखील विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे त्यांनी त्यांचा राजीनामा पाठवून दिला आहे. (Maratha reservation)

(हेही वाचा – Yamaha XSR 155 : यामाहाची आशियात गाजलेली CSR 155 बाईक आता येणार भारतात, जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्ये)

यापूर्वी हिंगोलीचे शिवसेनेचे खासदार हेमंत पाटील आणि नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांनी देखील आपल्या खासदार पदाचा राजीनामा दिला होता. त्यातच मनोज जरांगे पाटील यांनी आमदारांना खासदारांना राजीनामा न देण्याचं आवाहन केलं होतं. पण तरी देखील खासदार आमदारांच्या राजीनाम्याचे सत्र सुरुच आहे. त्यातच आता शिवसेना-भाजप आमदारांच्या राजीनाम्यामुळे सरकारच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे अजित पवार गटाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार माणिक कोकाटे यांनी मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी केली आहे. (Maratha reservation)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.