Chhagan Bhujbal : सरकारच्या विरोधात बोलणार होतो म्हणून राजीनामा दिला

मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यास भुजबळ यांनी सुरुवातीपासूनच विरोध केला आहे. त्यामुळे मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील आणि भुजबळ यांच्यात आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. भुजबळ देखील याच विषयावर स्वतःच्या सरकार विरोधात वक्तव्य करत आहेत.

292
Chhagan Bhujbal: बेकायदेशीरपणे केली जात असलेली भूसंपादन प्रक्रिया स्थगित करा; भुजबळांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
Chhagan Bhujbal: बेकायदेशीरपणे केली जात असलेली भूसंपादन प्रक्रिया स्थगित करा; भुजबळांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

ओबीसी मेळाव्यात सरकारच्या विरोधात बोलणार होतो म्हणून मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता, असे स्पष्टीकरण अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी दिले. ते प्रसार माध्यमांशी बोलत होते. (Chhagan Bhujbal)

मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यास भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी सुरुवातीपासूनच विरोध केला आहे. त्यामुळे मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील आणि भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्यात आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. भुजबळ (Chhagan Bhujbal) देखील याच विषयावर स्वतःच्या सरकार विरोधात वक्तव्य करत आहेत. त्यामुळे त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता आणि त्याची वाच्यता केली नव्हती. यावर राजीनामा स्वीकारला नसल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले. ही वेळ त्यांच्यावर का आली? याबाबत छगन भुजबळांनी (Chhagan Bhujbal) गुरुवारी (०८ फेब्रुवारी) खुलासा केला आहे. (Chhagan Bhujbal)

(हेही वाचा – Rahul Gandhi : राहुल गांधी यांच्याकडून पंतप्रधान मोदींचा जातीवाचक उल्लेख)

“कोणत्याही पक्षाने माझा राजीनामा मागितला नव्हता. पण मला वाटत होते की मी तिथे ओबीसी एल्गार सभेला जातोय, तर मला सरकारविरोधात बोलावे लागेल. त्यामुळे मी राजीनामा दिला. परंतु, मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री म्हणाले की राजीनामा दिल्याची गोष्ट बाहेर सांगू नका. म्हणून मी पावणे तीन महिने काहीच बोललो नाही. (Chhagan Bhujbal)

विरोधकांनी टीका केली की मंत्रिमंडळात बसता आणि सरकारविरोधात बोलता. विरोधकांच्या या टीकेवर मी गप्प बसलो. पण सरकार पक्षातील एक आमदार म्हणाला की भुजबळला लाथ मारून बाहेर काढा. लाथा मारायची भाषा ऐकली तेव्हा मी म्हणालो की राजीनामा दिल्याचे आता नाही सांगणार तर कधी सांगणार? सरकारमधील आमदार म्हणत होते की यांना लाथाडा आणि बाहेर काढा. आणि मी काही बोललो नसतो तर म्हणाले असते किती बेशरम माणूस आहे की खुर्चीला चिकटून बसला आहे. कोणी मला लाथ मारण्याची गरज नाही. त्यामुळे मी म्हणालो की राजीनामा दिला आहे, असे छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) म्हणाले. (Chhagan Bhujbal)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.