Praful Patel : प्रफुल्ल पटेल म्हणाले, शरद पवारांना हात जोडून विनंती आहे की…

180
Praful Patel : आमदारांच्या इच्छेचा आदर करा! प्रफुल्ल पटेल यांचे शरद पवार यांना आवाहन
Praful Patel : आमदारांच्या इच्छेचा आदर करा! प्रफुल्ल पटेल यांचे शरद पवार यांना आवाहन

पक्षातील बहुसंख्य आमदार, वरिष्ठ नेते, सामान्य कार्यकर्त्यांच्या इच्छेचा शरद पवारांना आदर करावा अशी आमची हात जोडून विनंती आहे. पक्षात चाचणी करून पक्ष कुठे उभा आहे हे लक्षात घेऊन त्यांनी त्यांचा आशीर्वाद आमच्यावर कायम ठेवावा, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी सोमवारी येथे केले. पक्षात वादाचे जे चित्र निर्माण झाले आहे ते समाप्त व्हावे. आमच्याकडून वाद निर्माण केला जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. तर पवार आमचे गुरु आहेत. आमच्या या कामाला त्यांचा आशीर्वाद असल्याचा दावा मंत्री छगन भुजबळ यांनी केला.

प्रफुल्ल पटेल यांनी आज अजित पवार यांच्यासोबत आज पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी बोलताना त्यांनी शरद पवार यांना उद्देशून आमदारांच्या इच्छेचा मान राखून शिंदे सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय मान्य करावा, असे आवाहन केले. शरद पवार यांनी आमच्या संदर्भात घेतलेला निर्णय आम्हाला लागू होत नाही. कारण हा बहुमताने घेतलेला निर्णय आहे. आम्ही पक्ष आहोत आणि बहुसंख्य आमदार आमच्या सोबत आहेत. त्यामुळे जे आम्हाला संख्या विचारात आहेत, त्यांनी आधी संख्या सांगावी, असे आव्हान पटेल यांनी दिले.

तर आम्ही कायदेशीर लढाई न लढता जनतेत जाऊ, असे शरद पवार म्हणाले होते. त्यावर नाव न घेता टीका करताना अजित पवार म्हणाले की, आम्ही न्यायालयात न जाता जनतेत जाऊ असे काही लोक काल म्हणाले होते. पण रात्री १२ वाजता पत्रकार परिषद घेऊन वेगळ्या घटना सांगितल्या जात आहेत. मात्र त्या सगळ्याला अर्थ नाही. आम्ही घेतलेली भूमिका योग्य आणि राज्याच्या आणि राष्ट्रवादीच्या भल्याची आहे. पक्ष कुणाकडे आहे चिन्ह कुणाकडे आहे हे ठरवण्याचा अधिकार निवडणूक आयोगाला आहे.

(हेही वाचा – Jitendra Awhad : पदे वाटायचा अधिकार किटी पार्टीला नाही : जितेंद्र आव्हाड)

आम्हीच पक्ष आहोत, बहुसंख्य आमदार आमच्याबरोबर आहेत. कुणाला हे बंड वाटते, पण तुम्हाला वाटून काही चालत नाही. त्याला कायदा, नियम आहेत. उद्या वाद निर्माण झाला तर आयोगाने दिलेला निर्णय अंतिम असतो, हे तुम्ही अलिकडेच पाहिले असल्याचे अजित पवार म्हणाले. बहुसंख्य आमदारांचा पाठिंबा आहे म्हणून अजित पवार इथे उपमुख्यमंत्री म्हणून बसला आहे, असे पवार यांनी सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षा सुप्रिया सुळेंची हकालपट्टीबद्दल प्रश्न केला असता, आम्ही इथे हकालपट्टी करण्याकरता बसलो आहोत का? आम्ही बेरजेचे राजकारण करतो आहोत. इथे कुणाची हकालपट्टी करायला बसलो नाही, असे अजित पवार म्हणाले.

राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार

प्रफुल्ल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी आज संघटनात्मक नव्या नियुक्त्या घोषित केल्या. त्यावेळी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष कोण? असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता, राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार साहेब आहेत हे तुम्ही विसरलात का? असा प्रतिसवाल अजित पवार यांनी केला.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.