मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रविवार 1 मे रोजी औरंगाबाद येथे घेतलेल्या सभेत पुन्हा एकदा मशिदींवरील भोंग्यांचा मुद्दा उचलून धरला. यावेळी त्यांनी भोंगे उतरवण्यासाठी सरकारला पुन्हा एकदा अल्टिमेटम दिले. पण राज ठाकरे यांचे भाषण सुरू असताना मध्येच अज़ान सुरू झाली. त्यावेळी त्यांनी अज़ान बंद करायचा इशारा दिला. यावरुन त्यांच्यावर टीका होत असतानाच, आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एक जूना व्हिडिओ व्हायरल होत आहे.
या व्हिडिओमध्ये मोदींचे भाषण सुरू असताना अज़ान सुरू झाली तेव्हा मोदी ती संपेपर्यंत थांबल्याचे पहायला मिळत आहे. मनसे-भाजप युतीच्या चर्चांना उधाण आलेले असतानाच आता मोदींच्या या व्हिडिओने राजकीय वर्तुळाचे लक्ष वेधून घेतले आहे.
(हेही वाचाः महाराष्ट्रात तयार झालेत ‘दहा’ नवीन जिल्हे, कोणते? वाचा)
मोदींनी भाषण थांबवले
पश्चिम बंगाल मधील खरगपूर येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची 27 मार्च 2016 रोजी सभा झाली. त्यावेळी त्यांचे भाषण सुरू असताना जवळच असलेल्या मशिदीवरील भोंग्यावरुन अज़ान सुरू झाली. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपलं भाषण मध्येच थांबवलं. अज़ान संपेपर्यंत मोदी एक शब्दही बोलले नाहीत. अज़ान चालू होती. आपल्यामुळे कोणाच्या पूजा,प्रार्थनेत व्यत्यय येऊ नये यासाठी मी काही काळ थांबलो, असं विधान पंतप्रधान मोदी यांनी केलं. त्यांच्या या विधानानंतर सभेला उपस्थित कार्यकर्त्यांनी टाळ्यांच्या कडकडाट मोदींचे कौतुक केल्याचे या व्हिडिओमध्ये दिसत आहे.
(हेही वाचाः 1 मे 1960 ला महाराष्ट्रापासून कसं वेगळं झालं गुजरात? वाचा)
पण मोदी आणि त्यांचे सभेतील हजारो श्रोते यांचे संवाद स्वातंत्र्य त्या अज़ानने हिरावून घेतले असतानाही हिंदूंच्या सद्गुण विकृतीमुळे ते गप्प राहिले. पण राज ठाकरे मात्र गप्प बसले नाहीत, अशा प्रतिक्रियाही आता येत आहेत.
राज ठाकरेंनी दिला इशारा
आपल्या भाषणादरम्यान अज़ान सुरू होताच राज ठाकरे यांनी इशारा दिला. माझी पोलिसांना नम्र विनंती आहे, माझ्या सभेच्या वेळी जर हे बांग सुरू करणार असती, तर आपण ताबडतोब तोंडात बोळा कोंबावा. यांना जर सरळ मार्गाने समजत नसेल तर त्यानंतर महाराष्ट्रात काय होईल मला माहीत नाही. त्यांना जर समजा सरळ भाषेत समजत नसेल तर एकदा काय ते होऊनच जाऊ दे, अशा शब्दांत राज ठाकरे यांनी इशारा दिला होता.
(हेही वाचाः राज ठाकरेंच्या ४५ मिनिटांच्या भाषणाचा पोलिसांनी केला ५ तास अभ्यास)
Join Our WhatsApp Community