विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या निमित्ताने अधिवेशनादरम्यान विविध कामांसाठी विधानभवनात येण्यासाठी गर्दी वाढू लागली आहे. आता या वाढत्या गर्दीला आवर घालण्याचा निर्णय विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी घेतली आहे. त्यानुसार अधिवेशनाच्या काळात अभ्यागतांना फक्त मंगळवार आणि गुरुवार या दोन दिवशीच तो देखील मर्यादित संख्येने प्रवेश देण्यात येईल, अशी घोषणा नार्वेकर यांनी शनिवारी केली. (Rahul Narvekar)
विधिमंडळाच्या अधिवेशन काळात विधानभवन परिसरात मोठ्या प्रमाणात अभ्यागतांची गर्दी होते. या गर्दीमुळे विधिमंडळ सचिवालय प्रशासन आणि सुरक्षा यंत्रणेवर त्याचा अतिरिक्त ताण येतो. अनेकदा विधानभवनाच्या आवारात चालायला देखील जागा मिळत नाही. त्याबद्दल अनेक आमदारांनी यासंदर्भात तीव्र शब्दात नाराजीही व्यक्त केली होती. त्यामुळे ही गर्दी नियंत्रणात आणावी, अशी मागणी गेल्या काही अधिवेशनात करण्यात येत होती. या पार्श्वभूमीवर विधानभवनातील गर्दीवर नियंत्रण आणण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. (Rahul Narvekar)
(हेही वाचा – Hoarding Accident: होर्डिंगचा प्रश्न हा केवळ मुंबईचाच नाही तर संपूर्ण राज्याचा – आ. तांबे )
अधिवेशन कालावधीत विधानसभेच्या प्रागंणात होणाऱ्या गर्दीवर नियंत्रण आणण्यासाठी उपाययोजन करण्याबाबत मंत्री आणि सदस्यांकडून मागणी करण्यात येत होती. याप्रकरणी पोलिस प्रशासन आणि सुरक्षा रक्षकांकडून पीठासीन अधिकाऱ्यांकडे मागणी करण्यात येत होती. त्याशिवाय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्री आणि इतर सदस्यांची सुरक्षा महत्त्वाची आहे. या वाढत्या गर्दीमुळे विधान भवनातील प्रशासनावर येणारा अतिरिक्त ताण या सर्व बाबींचा विचार करण्यात आला आहे. त्यानुसार विधानसभेतील गर्दीवर नियंत्रण आणण्यासाठी यापुढे विधान भवनामध्ये फक्त मंगळवार आणि गुरुवार या दिवशी मर्यादित संख्येने प्रवेश देण्यात येईल, असे राहुल नार्वेकर यांनी यावेळी जाहीर केले. (Rahul Narvekar)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community