राज्यातील शेकडो ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी रविवारी मतदान झाले. सोमवारी 19 सप्टेंबरला या शेकडो गावांचे निकाल मिळणार आहेत. मतमोजणीला सुरवात झाली असून, आतापर्यंत हाती लागलेल्या निकालानुसार सर्वात मोठा पक्ष भाजप ठरला आहे. तर सर्वात कमी ग्रामपंचायती ठाकरे गटाच्या वाट्याला आल्या आहेत. भाजपने 37 ग्रामपंचायतींमध्ये विजय मिळवत प्रथम स्थान प्राप्त केले आहे. त्यापाठोपाठ राष्ट्रवादी 19 ग्रामपंचायतींमध्ये विजय मिळवत दुस-या स्थानावर आहे. शिंदे गटाने 5 ग्रामपंचायतींमध्ये विजय मिळवला आहे, तर सर्वात कमी म्हणजे 4 ग्रामपंचायतींमध्ये ठाकरे गटाचा विजय झाला आहे. तर इतर पक्ष आणि आघाड्यांचा 10 ग्रामपंचायतींमध्ये विजय झाला आहे.
नंदूरबार आतापर्यंत जाहीर झालेला निकाल
नंदुरबार ग्रामपंचायतींची संख्या-19
- भाजप- 13
- शिंदे गट- 04
- काॅंग्रेस- 02
- राष्ट्रवादी-00
- अपक्ष-00
- ठाकरे गट- 00
दिंडोरी तालुक्यातील निकाल
दिंडोरी तालुक्यातील जानोरी ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीचे पॅनल विजयी, सरपंचपदी सुभाष नेहरे विजयी, मोहाडी ग्रामपंचायतीवर ठाकरे गटाचे पॅनल, सरपंचपदी आशा लहानगे विजयी, दिडोरी तालुक्यात राष्ट्रवादीचे दोन तर ठाकरे गट एका जागेवर विजयी.
Join Our WhatsApp Community