-
ऋजुता लुकतुके
देशाचा किरकोळ महागाई (Retail Inflation) दर हा ३.५४ टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. गेल्या पाच वर्षांतील हा नीच्चांकी दर आहे. हा दर चार टक्क्यांच्या आत असावा असं उद्दिष्ट रिझर्व्ह बँकेनं ठरवलं आहे. पण, प्रत्यक्षात ५ वर्षांत पहिल्यांदाच किरकोळ महागाई (Retail Inflation) दर ४ टक्क्यांहून खाली आला आहे. अर्थात आताचा दर खाली येण्यात महत्त्वाचा घटक आहे तो महागाई दर मापनासाठीचं बेस वर्ष बदलण्याचा निर्णय. त्यामुळे आताचा परिणाम हा निव्वळ आकडेमोडीचा आहे. जून महिन्यात महागाई दर ५.०६ टक्क्यांवर होता. त्यात लक्षणीय घट झाल्यामुळे मध्यवर्ती बँकेला दिलासा मिळाला आहे.
अन्नधान्याच्या किमती वाढल्यामुळे अन्नधान्य महागाई दर ७.४४ टक्क्यांवर पोहोचला. आणि त्याचे पडसाद किरकोळ महागाई (Retail Inflation) दरावर पडले होते.
(हेही वाचा – Faiz Hameed: पाकिस्तानी लष्कराने माजी ISI प्रमुखाला ताब्यात घेतलं; कोर्ट मार्शलचे आदेश)
Retail inflation in July falls below 4% to 3.54% for the first time in nearly five years, but driven down mostly by base effect.
Vegetable, fruits, eggs are some of the categories that saw continued sequential increase in prices.
Core inflation remains subdued at near 3.4% but… pic.twitter.com/6z2yctSoyK
— Ira Dugal (@dugalira) August 12, 2024
महागाई दराच्या आकड्यांबरोबरच देशातील औद्योगिक उत्पादनाचे आकडेही जाहीर झाले आहेत. आणि तिथेही सकारात्मक बदल दिसून येत आहे. देशाचा औद्योगिक उत्पादन दर एप्रिल ते जून तिमाहीत ५.२ टक्के इतका आहे. तर औद्योगिक उत्पादन इंडेक्सही ४.२ टक्क्यांवर पोहोचला आहे. सगळ्यात जास्त वाढ ही खाणकाम क्षेत्राची झाली असून ही वाढ १०.३ टक्के इतकी आहे. त्या खालोखाल औद्योगिक उत्पादन, ऊर्जा निर्मिती यांचीही वाढ झाली आहे.
देशातील अन्न धान्य उत्पादन मात्र एप्रिल ते जून तिमाहीत ५.५ टक्क्यांनी घटल्याचं समोर आलं आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community