सत्तेची खुर्ची डळमळीत झाली म्हणून सेनेला मुंबई‘करां’ची आठवण झाली, शेलारांचा टोला

जेव्हा वचन दिलेत तेव्हा पासून 500 चौ. फुटांच्या घरांचा मालमत्ता कर माफ करा, शेलारांची मागणी

129

आतापासूनच नव्हे तर वचन दिलेत त्या तारखे पासून 500 चौ.फु. घरांचा मालमत्ता कर पूर्ण माफ करा, अशी मागणी करीत भाजपा नेते आमदार अँड आशिष शेलार यांनी, आता सत्तेची खुर्ची डळमळीत झाली म्हणून शिवसेनेला मुंबई’करां’ची आठवण झाली असा टोलाही लगावला आहे. मुंबईतील 500 चौरस फुटापर्यंतच्या घरांना मालमत्ता कर माफ करण्यात येत असल्याची घोषणा सरकारने केली आहे. त्यावर प्रतिक्रिया देताना आमदार अँड आशिष शेलार म्हणाले की, या निर्णयाला एवढा उशीर का झाला? गेली चार वर्षे का निर्णय घेण्यात आला नाही. त्यामुळे आतापासून नको तर मागील चार वर्षांचा कर ही मुंबईकरांना परत करा. जेव्हा वचन दिलेत तेव्हा पासूनची करमाफी करा, अशी मागणी आमदार अँड आशिष शेलार यांनी केली आहे.

‘500 चौ.फु. जागेचा मालमत्ता कर पूर्ण माफ करा’

शेलार पुढे असेही म्हणाले की, मुंबईतील अती श्रीमंत सोडून ज्या मध्यमवर्गीयांची घरं 500 चौ. फु. पेक्षा मोठी आहेत, त्यांचाही 500 चौ. फु. पर्यंतचा कर माफ करा, म्हणजे ज्या मध्यमवर्गीय मुंबईकरांची घरे 600, 650, 700 चौरस फुटाची आहेत. त्यांचाही 500 चौरस फुटापर्यंत कर माफ करा व त्यापेक्षा जास्त असलेल्या क्षेत्रफळाचाच कर त्यांना आकारण्यात यावा. यासोबतच 500 चौ. फु. पर्यंतच्या दुकानदारांही हीच सुट देणार का? ज्यांंचा मुंबईत फुलांचा, भाजीचा, केशकर्तनालय, फळे सारख्या व्यवसाय करणारा छोटा व्यापारी आहे, त्याच्या गाळ्याचा 500 चौ. फुटापर्यंतचा कर माफ करा, अशी मागणी आमदार अँड आशिष शेलार यांनी केली आहे.

(हेही वाचा – पंढरपूरात ‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’, ७५ हजार मुलांची अनोखी मानवंदना!)

मुंबईकरांच्या निर्णयाला विलंब का झाला?

सरकारने विलंबाने घेतलेल्या या निर्णयाचा समाचार घेताना आमदार अँड शेलार पुढे म्हणाले की, सरकारच्या तिजोरीत खडखडाट होता तरीही प्रथम बिल्डरांना प्रिमियममध्ये 11 हजार कोटींची सुट दिलीत. बार, पब, रेस्टॉरंटना लायसन्स फीमध्ये सवलत दिलीत. विदेशी दारुला करात 50 टक्के सुट दिलीत वायनरींवर पण सवलतींची खैरात झाली, मग मुंबईकरांच्या निर्णयाला का विलंब झाला? आता पालिकेच्या सत्तेची खुर्ची डळमळली तेव्हा मुंबई”करां”ची आठवण झाली का? असा सवालही त्यांनी केला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.