‘द काश्मीर फाईल्स’ पाहून येणाऱ्या भाजप खासदारावर बॉम्ब हल्ला

161

सध्या देशात द काश्मीर फाइल्स या चित्रपटाची चांगलीच चर्चा सुरू आहे. या चित्रपटावरून आरोप-प्रत्यारोप सुरू असताना पश्चिम बंगालमधील नदिया येथून एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. राणाघाटातील भाजप खासदार जगन्नाथ सरकार यांच्यावर बॉम्ब हल्ला करण्यात आल्याचे समोर आले आहे. मी काश्मीर फाइल्स चित्रपट पाहून परतत होतो, त्यावेळी माझ्यावर हल्ला करण्यात आल्याचे खासदार जगन्नाथ सरकार यांनी सांगितले.

असा घडला प्रकार

पश्चिम बंगालच्या राणाघाट येथून भाजप खासदार जगन्नाथ सरकार यांच्या गाडीवर बॉम्ब हल्ला केल्याची घटना उघडकीस आली आहे. या हल्ल्यात त्यांची कार जळाली असून ते सुदैवाने बचावले. शनिवारी संध्याकाळी ही घटना घडली. नदिया जिल्ह्यात द काश्मीर फाईल्स हा चित्रपट पाहण्यासाठी खासदार जगन्नाथ गेले होते. हा चित्रपट पाहून परत येत असताना त्यांच्या कारवर हा बॉम्ब हल्ला करण्यात आला. गाडीचा वेग असल्यामुळे गाडीच्यामागे हा बॉम्ब पडला. म्हणून, ते सुदैवाने बचावले, असे त्यांनी सांगितले.

(हेही वाचा – बापरे! डिझेल २५ रूपयांनी महागले)

राष्ट्रपती राजवट लागू करण्याची केली मागणी

राज्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असून राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात यावी, अशी मागणी या घटनेनंतर खासदार सरकार यांनी केली आहे. राज्य सरकारने लोकशाहीला पायदळी तुडवले असून राज्यात कोणीही सुरक्षित नाही. म्हणूनच, राज्यातील सध्याची परिस्थिती थांबवण्यासाठी कलम 356 म्हणजेच राष्ट्रपती राजवट लागू करावी. अन्यथा हे सर्व थांबणार नाही, अशी मागणी जगन्नाथ यांनी केली आहे. दरम्यान, ‘द काश्मीर फाइल्स’ हा चित्रपट 11 मार्च रोजी रिलीज झाल्यापासून वादात सापडला आहे. यावर भाजप आणि विरोधी पक्ष एकमेकांच्या विरोधात आहेत. तर ‘द काश्मीर फाइल्स’ चित्रपटाने 7 दिवसांतच 100 कोटींहून अधिकचा व्यवसाय केला आहे. हा चित्रपट काश्मिरी पंडितांवरील अत्याचारावर आधारित आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.