शहापूर तालुक्यातील भातसा प्रकल्पाच्या १ हजार ४९१ कोटी ९५ लाख रुपयांच्या कामांसह जळगाव जिल्ह्यातील वाघूर प्रकल्पाच्या २ हजार २८८ कोटी ३१ लाख किंमतीच्या कामांना बुधवारी मंत्रिमंडळ बैठकीत सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.
( हेही वाचा : धक्कादायक! राज्यात पाच वर्षांखालील बालकांचे सर्वाधिक मृत्यू )
त्याचप्रमाणे औरंगाबाद जिल्ह्यातील ब्रह्मगव्हाण उपसा सिंचन योजना प्रकल्पास ८९०.६४ कोटींच्या चौथ्या सुधारित प्रशासकीय मान्यतेवर या वेळी मोहोर उमटवण्यात आली. ब्रम्हगव्हाण उपसा सिंचन योजना ही उर्ध्व गोदावरी उपखोऱ्यात असून जायकवाडी प्रकल्पाच्या बुडित क्षेत्रात प्रस्तावित आहे. या प्रकल्पाद्वारे औरंगाबादच्या पैठण तालुक्यातील सुमारे ६५ गावांमधील २० हजार २६५ हेक्टर शेती क्षेत्राला सिंचनाचा लाभ मिळणार आहे. २००९ मध्ये या प्रकल्पाला तिसऱ्यांदा सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती. बुधवारी झालेल्या निर्णयानुसार या प्रकल्पाला जलसंपदा विभाग व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या २०१८-१९ च्या दरसूचीवर आधारित चौथी सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.
Join Our WhatsApp Community