प्रत्येक भूमीवर हिंदूंचा अधिकार; आमदार Nitesh Rane यांचे वक्तव्य

58
कणकवली विधानसभेचे (Kankavali Assembly) आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी अजमेर दर्गा (Ajmer Dargah) संबंधी मोठे विधान केले आहे. हिंदू सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष विष्णू गुप्ता यांनी अजमेरमधील ख्वाजा मोईनुद्दीन चिश्ती यांचा दर्गा (Khwaja Moinuddin Chishti Dargah in Ajmer) संकट मोचन महादेव मंदिर असल्याचा दावा केला आहे. याबाबत अजमेर दिवाणी न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. न्यायालयाने ही याचिका स्वीकारल्यामुळे भाजपा आमदार नितेश राणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.  (Nitesh Rane)

(हेही वाचा – Army Aviation Training School : अत्याधुनिक तंत्रज्ञानयुक्त हेलिकॉप्टरमुळे वाढेल सैन्य दलाची ताकद – ले. जनरल नांबियार)

नितेश राणे यांनी समाज माध्यमांवर एक व्हिडिओ शेअर केला. त्यावर राणे म्हणाले की, आमच्या हिंदू राष्ट्रात प्रत्येक जमिनीवर हिंदू समाजाचा अधिकार आहे. जे हिंदू समाजाचे होते, ते हिंदू समाजाचेच राहील. तसेच कोर्टाने याचिका स्वीकारल्याबद्दल स्वागत करतो, असे नितेश राणे म्हणाले.
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे पुत्र आणि कणकवलीचे आमदार यांनी आपल्या हिंदू राष्ट्रात सर्व जमीन हिंदूंच्या मालकीची असल्याचा व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे. ते म्हणाले, “आपल्या हिंदू राष्ट्रात प्रत्येक भूमीवर फक्त आपल्या हिंदू समाजाचा हक्क आहे. अजमेर शरीफ दर्ग्यात शिवमंदिर असल्याचा दावा (Ajmer Sharif Dargah claims to Shiva temple) करणारा आमच्या हिंदू पक्षाने केलेला अर्ज न्यायालयाने स्वीकारला आहे, मी त्याचे स्वागत करतो. जे आपल्या हिंदू समाजाचे होते ते आपल्या हिंदू समाजात राहील, हे मी आत्मविश्वासाने संगतो.     
(हेही वाचा – Cyber ​​Crime : ‘डिजिटल अरेस्ट’ आणि ‘शेअर्स ट्रेडिंग’ सायबर फसवणुकीचे केंद्रबिंदू दुबई व्हाया चीन)
नुकतेच हिंदू समाजसेवक विष्णू गुप्ता (Vishnu Gupta) यांनी कोर्टात याचिका दाखल करून दावा केला होता की अजमेर दर्गा हे एक शिवमंदिर आहे जे पाडून दर्गा (Dargah) बांधण्यात आला होता. या प्रकरणाची दखल घेत न्यायालयानेही याचिका स्वीकारली असून, सर्व पक्षकारांना नोटीस पाठवून न्यायालयाने पुढील सुनावणीची तारीख २० डिसेंबर रोजी निश्चित केली आहे.
हेही पाहा –
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.