गेल्या दोन अडीच महिन्यापूर्वी शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार झाला, यावेळी शिंदे-फडणवीस गटाकडून १८ आमदारांना कॅबिनेट मंत्रिपदी संधी देण्यात आली होती. आता दुसऱ्या टप्प्यांतील मंत्रिमंडळ विस्तारही लवकरच होणार आहे. अशातच सचिवांना दिलेले अधिकार पुन्हा मंत्र्याकडे देण्याचा निर्णय शिंदे-फडणवीस सरकारने घेतला आहे.
(हेही वाचा – शिंदे गटाला परवानगी तर ठाकरेंचा अर्ज फेटाळला, ‘या’ मैदानावर होणार शिंदेंचा ‘दसरा मेळावा’)
शिंदे-फडणवीस सरकारच्या कामाचा वेग आता वाढणार अशी शक्यता वर्तवली जात आहे. कारण सचिवांना देण्यात आलेले विशेष अधिकार शिंदे-फडणवीस सरकारने आता संबंधित खात्यांच्या मंत्र्यांना दिले आहेत. त्यामुळे सरकारचे काम वेगाने वाढणार असे सांगितले जात आहे. मंत्रिमंडळ विस्तार उशिरा झाल्याने सचिवांना विशेष अधिकार सरकारकडून देण्यात आले होते. कोणत्याही खात्याचे काम अडून राहू नये, यासाठी हा निर्णय घेण्यात आला होता.
शिंदे-फडणवीस सरकारने ४ ऑगस्ट रोजी काही अधिकार हे सचिवांना बहाल केले होते. त्यामुळे मंत्रालयाचे सचिवालय झाल्याची टीकाही करण्यात आली होती. अखेर आता पुन्हा सचिवांकडचे हेच अधिकार संबंधित खात्याच्या मंत्र्यांना बहाल करण्यात आल्याचा निर्णय शिंदे-फडणवीस सरकारने घेतला आहे.
Join Our WhatsApp Community