बुलढाणा जिल्ह्यातील चिखली शहरातील संभाजीनगर भागात सोमवारी रात्री तीन वाजेच्या सुमारास चोरट्यांनी हात साफ केला आहे. या भागात राहणाऱ्या विष्णू बळीराम राऊत यांच्या घरात जबरी चोरी झाल्याचे सांगितले जात आहे. सातत्याने होणाऱ्या चोरीच्या घटनांमुळे संभाजीनगर भागात चोरट्यांच्या दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
काय आहे प्रकरण
संभाजीनगर भागात सोमवारी रात्री तीन वाजेच्या सुमारास विष्णु बळीराम राऊत यांच्या घरात चोरट्यांनी तब्बल १० लाख रूपयांचा ऐवज लंपास केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, यामध्ये वडिलोपार्जित दागदागिण्यासह सुमारे दहा लाख रुपयांपर्यंतचा ऐवज चोरट्यांनी पळवला. चिखली शहरातील संभाजीनगर परिसरात विष्णू राऊत राहतात. ते घराच्या बाहेरील बाजूस कुरूप लावून छतावर झोपले होते. यावेळी रात्री तीन वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. ज्या खोलीत राऊत यांचा मुलगा धनंजय झोपलेला होता तेथील कपाटाची तोडफोड केली. चोरट्यांनी सुमारे दहा लाख रुपयांचे सोने-चांदीचे दागिने आणि दोन हजार रुपये नगदी स्वरूपाचा ऐवज चोरला या चोरीची तक्रार पोलिसांत देण्यात आली आहे. या प्रकरणाने परिसरातील नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
(हेही वाचा – “शेवटचा १ दिवस, भोंगे बंद झालेच पाहिजे”, मनसेने दिलं रिमाइंडर)
गेल्या तीन दिवसांपूर्वीच पाच घरफोड्या
चिखलीत 27 एप्रिल रोजी रात्री पाच ठिकाणी घरफोड्या झाल्या होत्या. त्यानंतर 1 मेच्या रात्री पुन्हा घरफोडी झाली. अज्ञात आरोपीनी सोन्या चांदीच्या दागिन्यासह रोख रक्कम तपास केल्याची माहिती मिळतेय. चोरट्यांनी कपाटातील चपलाहार, गंठण, दोन अंगठया, नेकलेस, गहूपोत, झुंबर असे सुमारे वीस तोड्याचे दागिने तपास केले. पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला असून तपास सुरू असल्याचे सांगितले जात आहे.
Join Our WhatsApp Community