Sharad Pawar : कर्मकांडाला थोतांड म्हणून हिणवणाऱ्या शरद पवारांना नातू रोहित पवारांची चपराक

कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी कर्जत शहरात बंगला बांधला आहे.

213
Rohit Pawar यांना ‘अदृश्य शक्तीं’पासून दूर ठेवण्यासाठी पवार सरसावले?
Rohit Pawar यांना ‘अदृश्य शक्तीं’पासून दूर ठेवण्यासाठी पवार सरसावले?

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार सार्वजनिक जीवनात वावरताना स्वतःला निधर्मी दर्शवण्यासाठी कायम हिंदू धर्मातील कर्मकांडावर आक्षेप घेत असतात, त्यावर टीका करत असतात. पवारांच्या घराण्यात सगळे जण याच विचारधारेवर राजकीय जीवनात मार्गक्रमण करत असतात, अशी समजूत आहे. पण पवारांच्या या विचाराला त्यांच्या घरातून छेद मिळाला आहे. पवारांचे नातू आमदार रोहित पवार चक्क कर्मकांडाचे पालन करणार आहेत, तेही सर्वांच्या साक्षीने.

कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी कर्जत शहरात बंगला बांधला असून मंगळवारी, १३ जून रोजी विधिवत गृहप्रवेश करणार आहेत. त्यासाठी वास्तुशांतीचा कार्यक्रम आयोजित केला आहे. त्याची निमंत्रणे त्यांनी विरोधीपक्षातील नेत्यांना जाहीरपणे पाठविली आहेत. कर्जत शहरातील कुळधरण रोडवर त्यांचा हा बंगला आहे. त्याला ‘दिनकर’ असे नाव दिले आहे. दिनकर म्हणजे सूर्य, कर्जत जामखेड हा मतदारसंघ अखंड ऊर्जेचा स्त्रोत आहे. त्यामुळे बंगल्याला हे नाव दिल्याचे त्यांनी निमंत्रण पत्रिकेत म्हटले आहे. आता या बंगल्याची पूजा आणि कार्यालयाच्या उद्घाटनाचा कार्यक्रम त्यांनी ठेवला आहे. याची निमंत्रणे दिली जात आहे. मंळवारी १३ जूनला होणाऱ्या या कार्यक्रमांची निमंत्रणे नगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, खासदार डॉ. सुजय विखे पाटील आणि विधान परिषदेचे आमदार राम शिंदे यांना ट्विटरच्या माध्यमातून जाहीरपणे दिली आहेत.

एका बाजूला हिंदू धर्मातील पूजापाठ म्हणजे थोतांड आहे, मी देव मानत नाही, मी नास्तिक आहे, असे म्हणणारे शरद पवार आता रोहित पवारांच्या बंगल्याच्या वास्तुशांतीला उपस्थित राहून नातवाच्या कर्मकांडामध्ये सहभागी होणार का, अशी चर्चा सुरु झाली आहे.

(हेही वाचा Pandharpur Wari : आळंदीमध्ये मंदिरात पोलिसांसोबत झटापट करणारे तरुण खरंच वारकरी होते का?)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.