- मुंबई प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी आज विधान परिषदेत महायुती सरकारवर जोरदार टीका केली. नागपूर हिंसाचार, दिशा सालियन प्रकरण आणि औरंगजेब वादावरून त्यांनी सत्ताधारी भाजपा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांच्यावर गंभीर आरोप केले. अधिवेशनात गृह विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना त्यांनी भाजपावर निवडणूक डोळ्यासमोर ठेवून राजकारण करत असल्याचा दावा केला.
गृह विभागावर टीका
रोहित पवार (Rohit Pawar) म्हणाले, “अधिवेशनात आम्हाला गोल गोल उत्तरे दिली जात आहेत. गृह विभाग योग्य दिशेने काम करत नाही, असे स्पष्ट दिसते. आग लावण्याचे काम एखाद्या नेत्याच्या वक्तव्याने झाले आणि नंतर फडणवीस म्हणतात की संयमाने बोलावे. पण आग लावणाऱ्यांवर कारवाई झालीच पाहिजे. सरकारने सक्षम निर्णय घेण्याची गरज आहे.” त्यांनी नागपूर हिंसाचाराच्या संदर्भात सरकारच्या निष्क्रियतेवर बोट ठेवले आणि कारवाईची मागणी केली.
(हेही वाचा – भारत Gaganyaan मोहिमेसाठी सज्ज; वर्षअखेरीस रोबोट ‘व्योमित्र’ अंतराळात जाणार)
दिशा सालियन प्रकरणावर संशय
दिशा सालियन (Disha Salian) मृत्यू प्रकरण पुन्हा चर्चेत आल्यानंतर रोहित पवार (Rohit Pawar) यांनी यावर सविस्तर भाष्य केले. ते म्हणाले, “कुणीही व्यक्तीने न्याय मागितला असेल, तर त्याला न्याय मिळाला पाहिजे. दिशा सालियन (Disha Salian) यांच्या वडिलांनी तेव्हा सांगितले होते की कोणीही या प्रकरणाचे राजकारण करू नये. पण आता हे प्रकरण पुन्हा बाहेर आले आहे आणि मला वाटते की भाजपा यावरून राजकारण करेल. टायमिंग बघा, बिहार निवडणुकांच्या वेळीही असेच झाले होते. चार वर्षे हे प्रकरण का बाहेर आले नाही? आता निवडणुका जवळ आल्या की भाजपा हे मुद्दे का काढते?”
त्यांनी पुढे ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांच्यावर विश्वास व्यक्त केला. “आदित्य ठाकरेंना मी जवळून ओळखतो. मला पूर्ण विश्वास आहे की कितीही काही केले तरी या प्रकरणाशी त्यांचा काहीही संबंध नाही. एसआयटी नेमली, पण काय झाले? सर्व काही शांत आहे. मला वाटते हे फक्त निवडणुकीपुरते केले जात आहे,” असे ते म्हणाले.
(हेही वाचा – कोकण रेल्वे महामंडळाचे भारतीय रेल्वेत विलिनीकरण; CM Devendra Fadnavis यांची विधान परिषदेत घोषणा)
सालियन यांच्या याचिकेवर संशय
दिशा सालियन (Disha Salian) यांच्या वडिलांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवरही पवार यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “मुनगंटीवार यांचे म्हणणे आहे तेच मला वाटते. या प्रकरणात सुईच्या टोकाएवढेही तथ्य दिसत नाही. न्यायालय जो निर्णय देईल, तो सर्वांना मान्य असेल,” असे त्यांनी सांगितले. त्यांनी भाजपावर औरंगजेबाच्या मुद्द्यावरून लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपही केला. “औरंगजेबाचा मुद्दा मोठा करायचा प्रयत्न झाला, पण तो त्यांच्यावरच पलटला. आता हे प्रकरणही मोठे केले जाईल. आरोप असतील तर पुरावे द्या आणि प्रकरण संपवा. तीन वर्षांत काय केले, हे सांगा. फक्त बोलतात, काहीच करत नाहीत,” असे ते म्हणाले.
बिहार निवडणुकीचा संदर्भ
रोहित पवार (Rohit Pawar) यांनी भाजपावर बिहार निवडणुकीसाठी महाराष्ट्राचा वापर करण्याचा आरोप केला. “महाराष्ट्राच्या जोरावर बिहारच्या निवडणुका लढवणार आहात का? यात महाराष्ट्राची बदनामी होत आहे. कोरटकर आणि सोलापूरकर यांच्यासारख्या आरोपींना पकडा, पण त्यावर काहीच कारवाई होत नाही. फक्त भाषणे करून चालणार नाही,” असे त्यांनी सुनावले.
(हेही वाचा – Veer Savarkar यांच्या बदनामीचा खटला रेंगाळत ठेवण्याचा Rahul Gandhi यांचा प्रयत्न ठरला फोल)
शरद पवार यांच्या प्रश्नावर फडणवीसांचे उत्तर
शरद पवार (Sharad Pawar) यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर फडणवीसांनी दिलेल्या उत्तरावरही पवार यांनी टीका केली. “फडणवीसांनी उत्तर फिरवण्याचा प्रयत्न केला. मोठे नेते नाराज असल्याने असे उत्तर दिले असावे,” असा टोला त्यांनी लगावला.
मंत्र्यांच्या अनुपस्थितीवर आक्षेप
अधिवेशनादरम्यान मंत्र्यांच्या अनुपस्थितीवरही त्यांनी नाराजी व्यक्त केली. “आम्ही बोलत असतो तेव्हा मंत्री नसतात, फक्त राज्यमंत्री असतात. अधिकारीही उपस्थित नसतात. ही परिस्थिती बदलायला हवी,” अशी मागणी त्यांनी केली.
रोहित पवार (Rohit Pawar) यांनी महायुती सरकारवर गृह विभागाच्या निष्क्रियतेपासून ते दिशा सालियन प्रकरणातील राजकारणापर्यंत अनेक मुद्द्यांवर टीकास्त्र सोडले. त्यांच्या मते, भाजपा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून संवेदनशील प्रकरणांचा वापर करत आहे, ज्यामुळे महाराष्ट्राची प्रतिमा मलिन होत आहे. दिशा सालियन प्रकरणात ते आदित्य ठाकरेंच्या बाजूने उभे राहिले असून, भाजपाच्या रणनीतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. आता या प्रकरणात न्यायालय काय निर्णय घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community