विद्यार्थ्यांच्या भविष्याशी होणारा खेळ थांबवा… पवारांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

133

एमपीएससी परीक्षा घेणा-या कंपन्या या मुलांच्या भविष्याशी खेळ करत असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी केली आहे. त्यामुळे या सर्व परीक्षा या एमपीएससी मार्फतच घेण्यात याव्यात अशी मागणी रोहित पवार यांनी ट्वीट करत केली आहे. तसेच दोन वेगवेगळ्या जिल्ह्यांत परीक्षा केंद्र असल्याने विद्यार्थ्यांना होणारी अडचण कंपनीने दूर करण्याचे निर्देश शासनाने कंपनीला द्यावेत, अशीही मागणी रोहित पवार यांनी केली आहे.

शासनाने निर्देश द्यावेत

एकाच दिवशी दोन परीक्षांसाठी वेगवेगळ्या जिल्ह्यांत परीक्षा केंद्र आल्याने अनेकांना एका परीक्षेला मुकावं लागणार आहे. शासनाने परीक्षा घेणाऱ्या कंपनीला संबंधित अडचण सोडवण्याचे निर्देश तत्काळ द्यावेत आणि मदत केंद्र सुरू करून परीक्षार्थ्यांच्या सोयीनुसार परीक्षा केंद्र रिलोकेट करावेत, अशी मागणी रोहित पवार यांनी केली आहे. 

(हेही वाचाः आरोग्य विभागाच्या भरती परीक्षेत पुन्हा गोंधळ!)

विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ

 

काही दिवसांपूर्वी आरोग्य विभागाच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्यामुळे विद्यार्थ्यांना फार मोठा धक्का बसला होता. त्यावरुन आता रोहित पवार यांनी सरकारला विनंती केली आहे. उमेदवार मोठ्या कष्टाने अभ्यास करतात आणि आई-वडील पदरमोड करुन मोठ्या आशेने मुलांसाठी खर्च करतात, पण परीक्षा घेणा-या कंपन्या त्यांच्या भविष्याशी खेळतात, हे योग्य नाही. त्यामुळे येत्या काळात सर्व परीक्षा या एमपीएससी मार्फतच घेण्यात याव याव्यात, ही कळकळीची विनंती रोहित पवार यांनी राज्य सरकारकडे केली आहे.

(हेही वाचाः आरोग्य विभागाच्या भरती परिक्षेत महाघोटाळा)

एसटीचा मोफत प्रवास द्यावा

तसंच कोणत्याही परिस्थितीत ही परीक्षा पुढं ढकलू नये. वेगवेगळ्या पदांसाठी वेगवेगळी फी न घेता प्रत्येक परिक्षार्थ्याकडून एकाच पदाची फी घ्यावी. शिवाय पहिल्या वेळी परीक्षा रद्द झाल्याने आता सर्व परीक्षार्थींना परीक्षेला जाण्यासाठी एसटीचा प्रवास मोफत करायची परवानगी द्यावी, अशीही मागणी रोहित पवार यांनी केली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.